पुणेकरांना पहाटे मिळाली गोड शिकवण, मकर संक्रांतीनिमित्त कचरा वेचकांचा अनोखा संदेश, तुम्ही कराल कौतुक

Last Updated:
आज पहाटे पुणेकरांना एक वेगळा आणि शिकवण देणारा अनुभव आला. पुण्यातील रमणबाग शाळा आणि लोखंडी तालिम परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सकाळी कचरा टाकण्यासाठी आले असता एक आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला.
1/5
देशभरात आज मकर संक्रांत उत्साहात साजरी केली जात आहे. आज पहाटे पुणेकरांना एक वेगळा आणि शिकवण देणारा अनुभव आला. पुण्यातील रमणबाग शाळा आणि लोखंडी तालिम परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सकाळी कचरा टाकण्यासाठी आले असता एक आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला.

advertisement
2/5
कचरावेचक यावेळी नागरिकांच्या स्वागतासाठी पुढे आले. त्यांनी नागरिकांच्या हातात तिळगुळ देत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा गोड संदेश दिला. त्याचसोबत कचरा उघड्यावर टाकू नका आणि परिसर स्वच्छ ठेवा असा महत्त्वाचा संदेशही त्यांनी नागरिकांना दिला. या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व आणि माणुसकीचे नाते अधिक घट्ट झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

3/5
स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थाअंतर्गत कार्यरत कचरा वेचकांनी मकर संक्रांतीनिमित्त शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवला. रोजच्या सवयीप्रमाणे उघड्यावर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या दिवशी थांबवून, तिळगुळ देत त्यांचे तोंड गोड करण्यात आले. यासोबतच कचरा उघड्यावर न टाकता तो योग्य पद्धतीने देणे का गरजेचे आहे, याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

4/5
या उपक्रमासोबतच कसबा पेठ परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान कचरा वेचकांनी तिळगूळ वाटत कचरा कचरावेचकांनाच द्यावा, कचरा उघड्यावर टाकू नये आणि ओला-सुका कचरा वेगळा ठेवावा, असे संदेश देण्यात आली.कसबा पेठ झिरो वेस्ट करण्याचा उपक्रम स्वच्छच्या कचरा वेचकांनी सुरू केला आहे.

5/5
या रॅलीत स्वच्छ संस्थेचे समन्वयकही सहभागी झाले होते. सणाच्या निमित्ताने गोड शब्दांत संवाद साधत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement