ना एकत्र काम, ना कॉमन फ्रेंड्स; कशी झाली सोहम-पूजाची भेट, बांदेकरांच्या लेकाची पाणीपुरीवाली Love Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Soham Bandekar - Pooja Birari Love Story : आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी नुकतंच लग्न केलं. दोघे भेटले कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर ज्युनिअर बांदेकरांची लव्ह स्टोरी समोर आली.
advertisement
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पूजा म्हणाली, "आम्हाला माहिती नाही की आम्ही प्रेमात कधी पडलो." त्यावर सोहम म्हणाला, "झी युवावर ऑलमोस्ट सफळ संपूर्ण नावाची मालिका होती. त्यात पूजाने कॅमियो केला. त्यात डेली एक्सपेन्स देण्याचं काम करत होतो. पण तेव्हा मी तिच्याशी एकदाही बोललो नाही. ती फक्त इनिशिअल इंटरॅक्शन होती."
advertisement
advertisement
advertisement
चांगली मैत्री व्हावी वाला झोन होता आणि सोहमने पूजाला पाणीपुरी खायला बोलावलं. सोहम पूजाला ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरला पाणी पुरी खायला घेऊन गेला. त्या अर्धा तासांच्या भेटीत जाणवलं की हे खूप सेम आहे. सोहम म्हणाला, "माझा टाइमपास झोन कुठेच नव्हता. मी आता प्रेमात पडलो कर मला लग्नच करायचं आहे. तीचंही तेच होतं."
advertisement
advertisement
त्यानंतर सोहमने वडिल आदेश बांदेकर यांना सांगितलं, तेव्हा ते अमेरिकेत होते. आदेश बांदेकरांनी पूजाला पाहिलं तेव्हाच त्यांना ती आवडली होती. त्यानंतर आदेश बांदेकर यांनी सोहमला पूजाला पटवण्यासाठी फोर्स केला होता. बरेच दिवस सोहम काही म्हणत नव्हता तेव्हा बांदेकरांनी सोहमला सांगितलं की, तू खरा मर्द असशील तर हिच्याकडून होकार मिळवून दाखव.
advertisement







