Virar News : पतंग उडवायला गेले अन् आयुष्याची दोर कापली, विरारमधल्या दोन तरूणांसोबत काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनायक शितप आणि ईकांशा शितप असे खदानात बुडालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.
Vasai Virar News : विजय देसाई, वसई विरार, प्रतिनिधी : वसई विरारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हे उद्या 15 जानेवारी 2026 ला होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. असे असतानाच आता विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनायक शितप आणि ईकांशा शितप असे खदानात बुडालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.या घटनेने शितप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,आज मकरसंक्रात असल्या कारणाने अनेक तरूण पतंग उडवण्याचा आनंद लुटत होते.अशाच प्रकारे शितप बंधू हे विरारच्या बरफपाडामध्ये पतंग उडवायला गेले होते. पतंग उडवल्यानंतर दोघांनी खदानीत पोहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोघेही पोहायला खदानीत उतरले होते, पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
विनायक शितप आणि ईकांशा शितप असे खदानीत बुडालेल्या दोन्ही मुलांची नावे आहेत. हे दोघेही मुलं भाऊ असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन खदानीतून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच आता या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.
advertisement
दरम्यान दोन मुलांच्या या मृत्यूनंतर शितप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वसई विरारमध्ये या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:14 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Virar News : पतंग उडवायला गेले अन् आयुष्याची दोर कापली, विरारमधल्या दोन तरूणांसोबत काय घडलं?









