खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या; शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक, धुळ्यात राडा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
या हल्ल्यात घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिपक बोरसे, प्रतिनिधी
धुळे : धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तास आधीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या एका गंभीर घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार ऋषिकेश मोरे यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचा आरोप मनोज मोरे यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांमध्ये भीती पसरवून राजकीय दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
advertisement
कठोर कारवाई करण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून दगडफेक व तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे. मनोज मोरे यांनी याप्रकरणी भाजपचे विलास शिंदे यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
advertisement
आमदार मंजुळा गावित घटनास्थळी दाखल
शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित घटनास्थळी दाखल झाल्या. आमदार मंजुळा गावित यांनी हल्ला झालेला घराची पाहणी केली. आमदार मंजुळा गावीत यांच्यासह जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावीत यांनी घटनेचा निषेध केला. हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
धुळ्यात राजकीय वातावरण तापलं
advertisement
दरम्यान, या घटनेमुळे धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष दक्षता घेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Location :
Dhule,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या; शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक, धुळ्यात राडा








