Team India : '4 महिने दारूला स्पर्श नाही, आयुष्य बदललं...', हकालपट्टीनंतर टीम इंडियाचा स्टार झाला इमोशनल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
चार महिन्यांपासून मी दारू सोडली आहे. मागच्या 4 महिन्यांमध्ये मी एक थेंबही दारू प्यायली नाही. टीम इंडियातून मागच्या बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या स्टार खेळाडूने पहिल्यांदाच त्याच्या व्यसनाबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरून भाष्य केलं आहे.
मुंबई : चार महिन्यांपासून मी दारू सोडली आहे. मागच्या 4 महिन्यांमध्ये मी एक थेंबही दारू प्यायली नाही. टीम इंडियातून मागच्या बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या स्टार खेळाडूने पहिल्यांदाच त्याच्या व्यसनाबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरून भाष्य केलं आहे. मागच्या वर्षी या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मोठं वादळ आलं होतं. टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मागच्या 4 महिन्यांपासून मी दारू सोडली आहे, तेव्हापासून आपलं आयुष्य कसं बदललं? हे युझवेंद्र चहलने सांगितलं आहे.
काय म्हणाला चहल?
'मी ऐकलं की तू पार्टी ऍनिमल होतास?', असा प्रश्न चहलला विचारला गेला. 'ते पण काय दिवस होते. आता मी पार्ट्यांमध्ये जाऊन फक्त चहा पितो. मसाला चहा आणि कोल्ड्रिंक्स. मी दारू पूर्णपणे सोडली आहे, आता एक थेंबही घेत नाही', असं उत्तर चहलने दिलं. यावर मुलाखत घेणाऱ्याने चहलला दारू सोडून किती दिवस झाले? असा प्रश्न विचारला, त्यावर चार महिने असं चहलने सांगितलं.
advertisement
दारू का सोडली? असं विचारलं असता, एक वेळ येते जेव्हा तुम्हाला जाणवतं की आता पुरे झालं. मला आता बरं वाटत आहे. एका बाजूला आयुष्याची 35 वर्ष आहेत आणि दुसरीकडे हे 4 महिने. हे 4 महिने मला खऱ्या आयुष्यासारखे वाटतात, असं चहल म्हणाला. मी आधी खूप बिअर प्यायचो, पण आता हे सोडून दिलं आहे. आयुष्य खूप चांगलं आहे. माझ्यातील हा एकमेव दोष होता, जो मी सोडून दिला आहे. मी दिवाळी आणि ख्रिसमसच्या पार्टीला गेलो, तिथे लोक माझ्यासमोरच दारू पित होते, पण मी एका थेंबालाही स्पर्श केला नाही, हा मानसिकतेचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया चहलने दिली.
advertisement
आरजे महावश चांगली मैत्रिण
दरम्यान आरजे महावशसोबतच्या डेटिंगच्या बातम्या या फक्त अफवा आहेत. आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत, आमच्यात दुसरं काहीही नाही, असंही चहलने स्पष्ट केलं आहे. भारतीय टीममधून बाहेर असलेला युझवेंद्र चहल हा देशांतर्गत क्रिकेट आणि इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला. आता मार्च महिन्यात चहल आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना पुन्हा दिसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 7:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : '4 महिने दारूला स्पर्श नाही, आयुष्य बदललं...', हकालपट्टीनंतर टीम इंडियाचा स्टार झाला इमोशनल!








