शेवटची क्षणी जरांगे पाटलांची नवी मागणी, फडणवीसांनी उपोषण सोडायला यावे
शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याबद्दल त्यांचे आभार, पण आमच्या मनात एक इच्छा आहे. आमचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावे. जर हे सगळे उपोषण सोडवायला आले तर तर माझे आणि फडणवीसांचे वैर संपले. जर फडणवीस उपोषण सोडायला आले नाही तर माझे आणि त्यांचे वैर राहिल, असे जरांगे पाटील म्हणाले.
त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आज तुम्ही उपोषण सोडा. एकदा शासकीय अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला भेटतील. त्यावर, उपोषण सुटल्यावर मी कुणाला जवळ येऊ देत नसतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
– तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो
– मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील
– एक तासात सर्व जीआर काढा आणि आमच्याकडे घेऊन या
– त्यानंतर अंतिम निर्णय सांगू
सरकारने एकूण 3 जीआर काढावेत
– सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर
– आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा
– सर्वकाही सुरुळीत झाले तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्व मराठे मुंबई मोकळी करतील
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर राज्य सरकारच्या मागण्या केल्या मान्य, जीआर काढल्यानंतर आज रात्रीच मुंबई सोडणार
राज्य सरकारकडून विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली आणि बऱ्याच मागण्या मान्य केल्या आहे. यामध्ये हैदाराबाद गॅझेटियरची मागणीही मान्य केली आहे. तसंच सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितली आहे.
बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांनी बाजारपेठ बंदची हाक दिली असून व्यापाऱ्यांनी देखील हमी दर्शवली आहे.
90 टक्के आंदोलक मुंबईबाहेर गेले आहेत,अशी माहिती मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला दिली आहे.
– माझ्या अशिलाने सर्व वाहनांना मुंबईबाहेर काढण्याचे आदेश दिलेत
– कॅबिनेट सचिव माझ्या अशिलाला भेटण्यासाठी जात आहेत
– आणि माझ्या सूचना आहेत की काहीतरी तोडगा निघेल
– मी म्हणू शकतो की 90 टक्के निदर्शक निघून गेले आहेत
मुंबई: हायकोर्टाने आंदोलक आणि पोलिसांना दिलेली मुदत संपली आहे. तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान आणि परिसरात अजूनही आंदोलक आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची वाहने रस्त्यांवरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांकडून माईकने सूचना, गाड्या हटवण्याच्या सूचना
जागा रिकाम्या करण्याच्या पोलिसांकडून मराठा आंदोलकांना सूचना
दीड तासात मुंबई सीएसएमटी ते आझाद मैदान रिकामे करण्यासाठी कारवाई सुरू
न्यायमूर्ती –
कालच्या सुनावणी नंतर तुम्ही राज्य सरकारने काय काम केले ..
पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डेटा सादर करावा ..
तुम्ही लाऊडस्पिकरच्या मदतीने अनाऊसमेंट केली का ..
तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात अयशस्वी
लोकांच्या मनात भिती निर्माण झाली लोक घराबाहेर पडताना विचार करताय शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यावी लागली
हे फारच गंभीर आहे
राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या का ?
मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही
आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल
ॲड सतीश मानेशिंदे – काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो
कोर्ट काय म्हणाले?
फक्त ५ हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी ..मग उर्वरित लोकांना तुम्ही सुचीत करायला हवं ..
५० हजार ते १ लाख लोक मुंबईतील रस्त्यांवर आले आहेत..
प्रसार माध्यमांच्या मदतीने ज्यादा लोकांनी परत जावे असे आम्ही सुचीत केले
वाहनांची वाहन मालकांची माहीत तुम्हाला द्यावी लागेल
मी तर मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही
त्याचे दुष्परिणाम तो आणि मराठे जाणो
कुठल्याही थराला गेला तरी मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मी इथून हटणार नाही
मराठ्यांचा संयम पाहू नका, गाड्या पार्किंगला लावा, रेल्वेनं आणि एसटीनं प्रवास करा. शांत राहायचं सांगितलं, येड्यावानी करायचं नाही.
ही लढाई शांततेनं लढायची आणि जिंकायची, मी मरेस्तोवर मुंबई सोडणार नाही, फक्त कारण देऊ नका, न्यायालयाच्या नियमांचं पालन करावं
न्यायदेवता आपल्या बाजूनं उभी राहील. आपल्यावर अन्याय करणार नाही



