आरक्षणाची मागणी, सुरेश धस यांचा कलेक्टरांना फोन, अर्धा तास चर्चा, जरांगे यांनी उपोषण सोडले!

Last Updated:

Manoj Jarange Patil Hunger Strike Suspended: प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेले मनोज जरांगे यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगिती करण्यात आले.

मनोज जरांगे-सुरेश धस
मनोज जरांगे-सुरेश धस
अंतरवाली सराटी, जालना : मराठा आरक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करा, शिंदे समितीला निधी वाढवून द्या तसेच आरक्षण आंदोलनातील मुलांवरील केसेस मागे घ्या, अशा मागण्या त्यांनी पुन्हा एकदा शासनाकडे केल्या. सरकारने दिलेला शब्द पाळावा नाहीतर आम्ही मुंबईकडे कूच करून संपूर्ण शहर बंद पाडू, असा इशारा त्यांनी उपोषण सोडताना दिला.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेले मनोज जरांगे यांचे उपोषण सहाव्या दिवशी स्थगिती करण्यात आले. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस तसेच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.

आरक्षणासाठी येथून पुढे उपोषण करणार नाही, आता थेट मंत्र्यांना भिडणार, नडणार

आरक्षणाच्या मागणीसाठी येथून पुढे उपोषण करणार नाही. आता थेट मुंबईला जाऊन मंत्र्यांशी समोरासमोर लढू आणि भिडू. आम्हाला दिलेला शब्द जर पाळला नाही तर सरकारचे जगणे मुश्कील करू, असा इशारा त्यांनी दिला.शिंदे समितीला मुदतवाढ द्या, तिन्ही गॅझेट लागू करणार, विशेष कक्ष सुरू करणार, आरक्षण आंदोलनातील मुलांवरील केसेस मागे घ्या, आंदोलनात बलिदान झालेल्या दिलेल्या कुटुंबीयांना मदत द्या, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या.
advertisement

... तर आम्ही सरकारला सुखाची झोप लागू देणार नाही

सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करायला सरकारला अजून दोन ते तीन महिने लागतील, असे सुरेश धस यांनी सांगितले. त्यावर मनोज जरांगे यांनीही तयारी दर्शवली. सरकारला हवे असतील तर अजून तीन महिने घ्या परंतु कायद्याची अंमलबजावणी कराच, असा आग्रह मनोज जरांगे यांनी धरला. जर यावेळी आम्हाला आश्वासन देऊन फसवले तर आम्ही सरकारला सुखाची झोप लागू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
advertisement

फडणवीस यांच्यावर बोललो नाही, बोलणारही नाही परंतु....

देवेंद्र फडणवीस यांना मी मराठा आरक्षणासंबंधी आणि आश्वासनासंबंधी प्रश्न केला होता. परंतु त्यांनी अद्याप मला प्रश्नाचे उत्तर दिले नाही. गेल्या तीन महिन्यांपासून मी त्यांच्यावर काहीच बोललो नाही, बोलणारही नाही. त्यांनी आता गोरगरीब मराठ्यांचे दु:ख जाणून निर्णय घ्यावा. नाहीतर मी मराठा समाजाशी बांधिल आहे, आम्ही आमची भूमिका ठरवू, असेही जरांगे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आरक्षणाची मागणी, सुरेश धस यांचा कलेक्टरांना फोन, अर्धा तास चर्चा, जरांगे यांनी उपोषण सोडले!
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement