advertisement

Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या किती? अहवालातून आकडेवारी समोर

Last Updated:

maratha aarakshan survey in marathi : या अहवालानुसार, राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के आहे. या अहवालातून अखेर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या समोर आली आहे.

राज्यात मराठा समाज किती?
राज्यात मराठा समाज किती?
मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation News In Marathi) मुद्दा महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचला आहे. त्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन (Maratha Reservation Special Assembly session) बोलावण्यात आलं आहे. दरम्यान विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मगासवर्ग आयोगाचा मसुदा कॅबिनेटच्या बैठकीत मांडण्यात आला. या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या अहवालात अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातील मराठा समाजाची एकूण लोकसंख्या किती आहे, याबाबतची आकडेवारीही देण्यात आलेली आहे.
या अहवालानुसार, राज्यात मराठा समाजाची (Maratha Samaj) लोकसंख्या 28 टक्के आहे. या अहवालातून अखेर मराठा समाजाची एकूण लोकसंख्या समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. सुमारे 52 टक्के आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती आणि गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे राज्यातील 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणं पुर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती आयोगाने अहवालात दिली आहे.
advertisement
पिवळी रेशन कार्ड धारकांपैकी 21.22 टक्के कुटुंबं ही मराठा समाजातील आहेत. या आकडेवारीवरून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होतंय,असं राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. दारिद्र्य रेषेखालील एकूण कुटुंबांपैकी मराठा समाजाची 18.09 टक्के इतकी कुटुंबं आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या पैकी 94 टक्के व्यक्ती या मराठा समाजातील असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
advertisement
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून देखील मराठा समाजाला कशा पद्धतीने 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देता येऊ शकतं, यासाठी विविध राज्यातील उदाहरणं या मसुद्यात नमूद केली आहेत. थोडक्यात 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडूनही टिकणारं आरक्षण देता येऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या किती? अहवालातून आकडेवारी समोर
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement