Mira Bhayandar Marathi Morcha: मीरा रोडमध्ये मराठी मोर्चेकऱ्यांची धरपकड, पोलिसांकडून मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mira Bhayandar Marathi Morcha: पोलिसांकडून दिसेल त्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात येत आहे. या प्रकारामुळे मीरा रोडमधील ओम शांती परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
मीरा-भाईंदर : बिगर मराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थिती मोर्चाला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांकडून दिसेल त्या आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्यात येत आहे. या प्रकारामुळे मीरा रोडमधील ओम शांती परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
मराठी भाषेच्या हक्कांसाठी मीरा रोड येथे आज (मंगळवार) मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्च्याआधीच नाट्यमय घडामोड घडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय मनसे आणि इतर मराठी संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. बिगर मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यावेळी पोलीस कुठे गेले होते, असा सवाल करण्यात आला.
advertisement
पोलिसांच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया...
पोलिसांकडून मराठी संघटनांच्या मोर्च्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी काही सामान्य मराठी भाषिकांनादेखील ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
मीरा-भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी बिगर मराठी व्यापारी दुकानदारांनी बंद पुकारत मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठीभाषिकांविरोधातही टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चाला भाजपची फूस असल्याचा आरोप केला. मारहाणी मागील घटना सांगताना मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान सहन कसा करायचा असा सवाल केला. या मोर्चाविरोधात 8 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध मराठी संघटनांसह आज मनसेने मोर्चाची हाक दिली होती. मात्र, मोर्चा आधीच पोलिसांनी जाधवांना अटक केली.
advertisement
Location :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
July 08, 2025 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mira Bhayandar Marathi Morcha: मीरा रोडमध्ये मराठी मोर्चेकऱ्यांची धरपकड, पोलिसांकडून मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न...