advertisement

नाशिकमध्ये मनसेचा मोठा डाव, भाजपला दूर सारत शिंदेसेनेसोबत सेटिंग; नव्या युतीची Inside स्टोरी

Last Updated:

नाशिकमध्ये शिंदेसेना आणि भाजप युतीची शक्यता चर्चेत असतानाच शिंदेसेना आणि मनसे यांची आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

News18
News18
नाशिक : नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीसह विविध समित्यांमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेल्या पवार सत्तास्थापनेपूर्वी शिंदे गटात गेल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये शिंदेसेना आणि भाजप युतीची शक्यता चर्चेत असतानाच शिंदेसेना आणि मनसे यांची आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नव्या युतीला शिवसेना–मनसे आघाडी असे नामकरण करण्यात आले आहे.

राजकीय चर्चांना उधाण

नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या एकमेव नगरसेवक असलेल्या मयुरी पवार यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ही घडामोड अधिक महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, मयुरी पवार या याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या. मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच त्यांनी शिंदे गटाची साथ स्वीकारल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement

समीकरणांवर काय प्रभाव पडणार? 

मनसेला सोबत घेतल्यामुळे शिंदेसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा मिळून स्थायी समितीवरील एक सदस्य वाढणार आहे. त्यामुळे स्थायी समिती, प्रभाग समिती, स्वीकृत नगरसेवक तसेच महापालिकेतील विविध समित्यांवरील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी काळात होणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांवर या नव्या आघाडीचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
advertisement

सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी महत्त्वाची

नाशिक महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी महत्त्वाची मानली जात आहे. भाजप, शिंदेसेना, ठाकरे गटाची शिवसेना आणि आता मनसे यांच्यातील संभाव्य युती–आघाडीमुळे नाशिकचे राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. मनसेचा केवळ एकच नगरसेवक असला तरी योग्य वेळी घेतलेला राजकीय निर्णय सत्ता समीकरणांमध्ये निर्णायक ठरू शकतो.

पुढील काही दिवसांत आणखी उलथापालथ होण्याची शक्यता

advertisement
दरम्यान, शिंदेसेना आणि मनसे यांची ही आघाडी आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम घडवणार, तसेच भाजप या समीकरणात नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये मनसेचा मोठा डाव, भाजपला दूर सारत शिंदेसेनेसोबत सेटिंग; नव्या युतीची Inside स्टोरी
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement