राज ठाकरेंची युतीची घोषणा अन् दुसरीकडे शिलेदाराचा मनसेला रामराम, शिवसेनेत केला प्रवेश

Last Updated:

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन काही वेळ होत नाही तेच च छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्ष

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: मुंबई महापालिकासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मराठी माणसाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. युतीची घोषणा करून काही तास उलटत नाही तेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मनसेला धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मनसेच्या जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
advertisement
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच आज  मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, आज बुधवारीच  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन काही वेळ होत नाही तेच च छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी राज ठाकरेंना धक्का देत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.
advertisement
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुमित खांबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मराठवाड्यातील चार जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुमित खांबेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेला हा धक्का मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा जल्लोष
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच राज्यभरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये   ठाकरे बंधूंच्या युतीनंतर चंद्रकांत खैरे यांनी पेढे भरून आनंद व्यक्त केला. यावेळी  चंद्रकांत खैरे यांनी भावुक होऊन शिवसैनिकांना पेढे भरवले. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
advertisement
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर लढलेली शिवसेना पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष होता. भाजपसोबत सेनेनं पालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता सेनेत दोन गट पडल्यानंतर आता ठाकरे गटाला मनसेची ताकद मिळाली आहे. त्यामुळे आगामी छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरेंची युतीची घोषणा अन् दुसरीकडे शिलेदाराचा मनसेला रामराम, शिवसेनेत केला प्रवेश
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement