Municipal Election : बाळासाहेबांच्या पावलावर आदित्य ठाकरेंच पाऊल, संभाजीनगरमध्ये जाऊन केली इतिहासाची पुनरावृत्ती

Last Updated:

संभाजीनगरमध्ये प्रचार करताना शिवसेना उबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कृतीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.

aditya thackeray followed balasaheb thackeray footsteps
aditya thackeray followed balasaheb thackeray footsteps
Municipal Election News : छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, अविनाश कानडजे : शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी संभाजीनगरमध्ये प्रचाराला सूरूवात केली आहे. विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये प्रचार करताना शिवसेना उबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या कृतीची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
खरं तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना युबीटीने आजपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराला सूरूवात केली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी संस्थान गणपतीला नारळ फोडून आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता.अशाप्रकारे त्यांनी एकप्रकारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी रणशिंग फुंकले आहे.
विशेष म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील 1988 साली संस्थान गणपती येथ नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला होता.आज तब्बल 37 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे यांनी आजोबांप्रमाणे संस्थान गणपतीला नारळ फोडून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे याची संभाजीनगरमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
जीपच्या बोनटवर उभं राहून आदित्य ठाकरेंचे भाषण
हे सरकार आपल्याला परवडणारे आहे का, आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला.पालकमंत्र्यांचे व्हीडिओ येतात पैसे दिसतात हे पैसे कुठून येतात. इथल्या खासदार ची कसली दुकान आहे.बॅगेतले पैसे निवडणुकीत बाहेर येतील हाथ लावू नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.तसेच मुंबईत आपण एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज हफ्तेबाज आहेत.ते शिवसेना नाही ते मींध्ये चिंधी चोर टोळी आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केली आहे.
advertisement
आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचे बोलणार नाही. हे म्हणतील मेट्रो देतो याना विचारा पाणी द्या मग बाकीचे बोला. यांच्याकडे दाखवण्यासारखे काही नाही, मग जातीय तेढ निर्माण करतात, नोकऱ्या बाबत बोलत नाही. कुणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात, पालघर मधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजप मध्ये का घेतला ते आधी सांगा मग आम्हाला प्रश्न विचारा, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election : बाळासाहेबांच्या पावलावर आदित्य ठाकरेंच पाऊल, संभाजीनगरमध्ये जाऊन केली इतिहासाची पुनरावृत्ती
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement