मोर्चा सत्याचा पण चर्चा अमित ठाकरेंची, बदललेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं

Last Updated:

Amit Thackeray: सत्याच्या मोर्चात अमित ठाकरे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अमित ठाकरे-आदित्य ठाकरे
अमित ठाकरे-आदित्य ठाकरे
मुंबई : निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराविरोधात महाविकास आघाडीसह मनसेने सत्याचा मोर्चा काढला आहे. मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महाापलिका दरम्यान मनसेसह महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील सहभागी झालेले आहेत.
मतदान यंत्रातील कथित घोळ आणि मतदारयाद्यांवर आक्षेप नोंदवत गेली काही महिने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीने तीव्र लढा छेडला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सत्याचा मोर्चाचे नियोजन सुरू होते. शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आजच्या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले होते.

बिअर्डवाले अमित ठाकरे जेव्हा क्लिन शेव्ह करून मोर्चाला हजेरी लावतात...!

advertisement
सत्याच्या मोर्चात अमित ठाकरे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अमित ठाकरे म्हणजे वाढलेले केस आणि दाढी, जिन्स, पायातले स्पोर्ट्स शूज यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त अतिशय वजनदार वाटायचे... आज मात्र अमित ठाकरे अनेकांना ओळखूनही आले नाही. कारण मोर्चाला येताना त्यांचा लूक बदललेला दिसला. क्लिन शेव्ह करून त्यांनी मोर्चाला हजेरी लावली. अमित ठाकरेंची तुकतुकीत कांती सभास्थळी चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या बदललेल्या लूकबद्दल मोर्चातील तरुण नेत्यांनीही त्यांच्याकडे विचारणा केली.
advertisement
https://images.news18.com/news18marathi/uploads/2025/11/Amit-Thackeray-new-look_1324488-2025-11-060a5075632531be5ddf7d0ee6849637.mp4

ठाकरे भावाभावाचे फोटोसेशन

अमित ठाकरे यांचा बदललेला लूक चर्चेचा विषय ठरत असताना आदित्य ठाकरे यांनाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मंचावर बसलेले असताना आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी पोज दिली. दोन भावांच्या फोटोत तिसरे बंधू वरुण सरदेसाई देखील सहभागी झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोर्चा सत्याचा पण चर्चा अमित ठाकरेंची, बदललेल्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement