Nagpur : नागपूरमध्ये नवमतदारांची लाट! नितीन राऊतांच्या मतदारसंघात सर्वाधिक वाढ, राजकीय गणितं बदलणार?

Last Updated:

Nagpur Voters : विधानसभा निवडणुकीच्या वेळी वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना आता दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मतदारांची संख्या वाढली आहे.

नागपूरमध्ये नवमतदारांची लाट! नितीन राऊतांच्या मतदारसंघात सर्वाधिक वाढ, राजकीय गणितं बदलणार?
नागपूरमध्ये नवमतदारांची लाट! नितीन राऊतांच्या मतदारसंघात सर्वाधिक वाढ, राजकीय गणितं बदलणार?
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तब्बल 80 हजार नव्या मतदारांची भर पडली असून, त्यामुळे निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना आता दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मतदारांची संख्या वाढली आहे.

महिलांचा आणि तरुण मतदारांची संख्या वाढली...

विशेषतः महिला आणि युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे हा नवमतदारवर्ग कुणाच्या बाजूने झुकतो, यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वच पक्ष आता नव्या मतदारांवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत.

उत्तर नागपूर मतदारसंघात सर्वाधिक वाढ

advertisement
माजी मंत्री, काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघात सर्वाधिक 14,671 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राऊत यांच्यासमोर आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

हिंगणा आणि कामठीतही मोठी वाढ

हिंगणा आणि कामठी या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 11 हजारांहून अधिक नवमतदारांची नोंद झाली आहे. हे दोन्ही मतदारसंघ नागपूरच्या राजकीय पटलावर निर्णायक मानले जातात. त्यामुळे येथील मतदारांची वाढलेली संख्या कोणत्या पक्षाला फायदा करून देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement

निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची यादीच ग्राह्य

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादीच अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे त्या तारखेपर्यंत नाव नोंदवलेले नागरिकच मतदान करू शकतील.

नागपूर जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या

या नव्या नोंदणीमुळे नागपूर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 45,97,343 इतकी झाली आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 80 हजार नव्या मतदारांमुळे या निवडणुकांमध्ये पारंपरिक मते आणि सत्ता समीकरणं दोन्ही बदलण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur : नागपूरमध्ये नवमतदारांची लाट! नितीन राऊतांच्या मतदारसंघात सर्वाधिक वाढ, राजकीय गणितं बदलणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement