गडकरींचा कट्टर समर्थक, नागपूरमध्ये भाजपचा एकमेव मुस्लिम उमेदवार, पै. कामील अन्सारी कोण आहेत?

Last Updated:

Nagpur Mahapalika Election: भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 143 पैकी एका मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिले आहे.

News18
News18
नागपूर :  नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने यंदा नवी खेळी खेळली आहे. भाजपची  उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. भाजपने 151 पैकी 143 ठिकाणी उमेदवार दिले आहेत तर केवळ 8 जागा मित्रपक्षांना सोडले आहेत. विशेष म्हणजे या यादीत भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 143 पैकी एका मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. त्यामुळे या उमेदवाराची मोठी चर्चा सध्या राज्याच्या राजकरणात होत आहे.
नागपूर हा भाजपला बालेकिल्ला असून अनेक वर्षे तिथे भाजपची सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे मुख्य कार्यालय असलेल्या रेशीमबागेची जागा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली आणि मोमिनपुरा प्रभागातून कामिल अन्सारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपकडून ते एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत. हिंदू–मुस्लिम सलोखा आणि सामाजिक ऐक्यासाठी ओळखले जाणारे कामिल अन्सारी नागपूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे कामील अन्सारी यांचं म्हणणे आहे. त्यांची उमेदवारी नागपूरच्या बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधणारी आहे. त्यामुळे राज्यात ज्यांची सध्या चर्चा सुरू आहे असे कामिल अन्सारी आहेत तरी कोण? याविषयी जाणून घेऊया
advertisement

कोण आहेत कामिल अन्सारी?

  • कामिल अन्सारी हे बुनकर ओबीसी असून ते ‘पसमांदा मुस्लिम’ समुदायाशी संबंधित आहेत.
  • माजी मंत्री दत्ता मेघे यांना ते आपले राजकीय गुरु मानतात. आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वाखालील तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ते संचालक आहेत.
  • अन्सारी यांनी क्रीडाप्रेमी असून कुस्ती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामुळे शहरात त्यांची ओळख ‘कामिल पैलवान’ म्हणून आहे.
  • यंग मुस्लिम फुटबॉल क्लबमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
advertisement

भाजपकडून उमेदवारी का?

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याबाबत आणि मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्याबाबत विचारले असता, कामिल अन्सारी स्पष्टपणे सांगतात, मी सर्वात प्रथम या देशाचा नागरिक आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपूर शहराचा विकास केला. नागपूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलो आहे. मुस्लिम समाज बदलत आहे, आता धर्माचे नाही तर विकासाचे राजकारणावर त्यांचा विश्वास आहे.
advertisement

नागपूरमध्ये कोणत्या पक्षाचे किती मुस्लिम उमेदवार?

नागपूर मनपा निवडणुकीत काँग्रेसने 11 मुस्लिम उमेदवारांना , बहुजन समाज पक्षाने 3 तर एआय-एमआयएम कडून सर्व 17 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गडकरींचा कट्टर समर्थक, नागपूरमध्ये भाजपचा एकमेव मुस्लिम उमेदवार, पै. कामील अन्सारी कोण आहेत?
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement