Mrs. Deshpande साठी सिद्धार्थ चांदेकरलाच का निवडलं? दिग्दर्शकाने सांगितलं 'ते' सीक्रेट, म्हणाले 'तेव्हाच मी ठरवलं...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Siddharth Chandekar casting for Mrs. Deshpande: सध्या 'मिसेस देशपांडे' वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहेच, पण त्यातील कलाकारांच्या निवडीवरूनही अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
advertisement
advertisement
नागेश कुकुनूर यांना अनेक दिवसांपासून एका थ्रिलर विषयावर काम करायचं होतं. त्यांना कळलं की एका निर्मिती संस्थेकडे 'ला मांते' या गाजलेल्या फ्रेंच वेब सीरिजचे अधिकार आहेत. नागेश म्हणतात, "मी ती सीरिज आधीच पाहिली होती. त्यातील नातेसंबंधांची गुंतागुंत जर भारतीय वातावरणात मांडली, तर ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा मला विश्वास होता. म्हणूनच या प्रयोगाला मी होकार दिला."
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नागेश कुकुनूर यांनी यावेळी भाषेच्या मुद्द्यावरही आपलं रोखठोक मत मांडलं. अनेक लोक म्हणतात की सिनेमाला भाषा नसते, पण नागेश यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते, "भाषेची स्वतःची एक लय आणि संस्कृती असते. दिग्दर्शकाला ती लय गवसली पाहिजे. ज्या भाषेवर तुमची पकड नाही, त्या भाषेत उगाच प्रयोग करू नका. जर तुम्हाला भाषेची जाण असेल, तरच तुमची कलाकृती प्रेक्षकांच्या काळजाला भिडते."










