नागपुरात जळालेली मानवी हाडं अन् मांस आढळलं, सख्ख्या भावाचा कांड बघून पोलिसांचाही उडाला थरकाप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं सख्खा मोठा भाऊच लहान भावाचा वैरी ठरला.
नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातून रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं सख्खा मोठा भाऊच लहान भावाचा वैरी ठरला. मोठ्या भावाने लहान भावाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत.
अरुण तुरारे असं हत्या झालेल्या ४३ वर्षीय लहान भावाचं नाव आहे. तर चंद्रशेखर तुरारे असं आरोपी मोठ्या भावाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपासून तुरारे भावंडांमध्ये शेतातील विहीर, पाणी, पाइपलाइन आणि शेत रस्त्यावरून सातत्याने वाद सुरू होते. याच वादातून चार दिवसांपूर्वी भावंडांमध्ये तीव्र भांडण झालं. याच वादाचा राग मनात ठेवून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली.
advertisement
गोळ्या झाडून हत्या, मृतदेह जाळून नाल्यात टाकला
आरोपी चंद्रशेखर तुरारे याने लहान भाऊ अरुण तुरारे याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर, हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी आरोपीने मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आणि नंतर तो मृतदेह एका नाल्यात टाकून दिला. नाल्याजवळ मानवी हाडे आणि मांस जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतक अरुण तुरारे यांच्या पत्नी ज्योत्स्ना तुरारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर तुरारे याच्याविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. शेतीच्या किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाने आपल्याच भावाची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक अरुण तुरारे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले आहेत.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 15, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपुरात जळालेली मानवी हाडं अन् मांस आढळलं, सख्ख्या भावाचा कांड बघून पोलिसांचाही उडाला थरकाप











