Nagpur Crime : 37 परप्रांतीय मजुरांच्या तस्करीचा डाव उधळला, 'त्या' एका पुराव्याने पर्दाफाश,नागपुरमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मध्यप्रदेशवरून आलेल्या 37 मजुरांची मानवी तस्करी केली जात होती. यामध्ये 23 महिला 5 पुरुष आणि काही अल्पवयीन मुलांचा समावेश होता.

NAGPUR CRIME
NAGPUR CRIME
Nagpur Crime News : वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मध्यप्रदेशवरून आलेल्या 37 मजुरांची मानवी तस्करी केली जात होती. यामध्ये 23 महिला 5 पुरुष आणि काही अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी हा तस्करीचा डाव उधळला आहे आणि या मजुरांची सूटका केली आहे. या घटनेनंतर आता कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मजुरांना शिवणी येथे सोयाबीन कापणीसाठी नेले जाणार होते. पण कॉन्ट्रॅक्टरने या मजुरांना सब कॉन्ट्रॅक्टरकडे दिले होते. या सब कॉन्ट्रॅक्टरने तिथले काम संपले असल्याने तुम्हाला सातारा घेऊन जात असल्याची माहिती देण्यात आली होती. पण सातारा जाण्यास मजूरांचा विरोध होता. तरी देखील 23 महिला 5 पुरुष आणि काही अल्पवयीन मुला मुलींना ट्रकमधून जबरदस्ती तस्करीकडून नेले जात होते.
advertisement
या लोकांना तिकडे जायचे नव्हते पण त्याना जबरदस्ती त्यांना नेले जात होते. या बदल्यात मजुरांनी सब कॉन्ट्रॅक्टरला पैसै देण्याची तयारी केली होती.यावेळी सब कॉन्ट्रॅक्टरने त्यांच्याकडून 1 लाखाची मागणी होती. पण इतकी मोठी रक्कम जुळवणे मजुरांसाठी अवघडच होते, तरी देखील मुजरांनी अनेकांना फोन लावून 57 हजार रूपये जुळवले होते. पण तरी त्यांची सुटका झाली नव्हती.
advertisement
या दरम्यान आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव मजुरांना होताच ते घाबरले होके. याचवेळी मजुरांपैकी एका अल्पवयीन मुलाकडे फोन होता. त्याने हा फोन सर्वांपासून लपून ठेवला होता. या मोबाईलद्वार् त्याने 112 नंबरवर फोन लावून एका एनजीओजला तस्करी होत असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच एनजीओने तत्काळ नागपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर नागपूर एसपी रवींद्रकुमार सिंगल यांनी वाशिमच्या एसपींना सर्व घटनाक्रम सांगून हा ट्रक पकडला आणि मजुरांची सुटका करण्यात आली आहे.
advertisement
सुटकेनंतर या मजुरांना वाशिममधून टेम्पोने नागपूरमध्ये आणण्यात आले आहेत. त्यानंतर गपूर पोलीस आता या सगळ्यांना त्यांच्या गावाला पाठवत आहे. तसेच ज्या काँट्रॅक्टर आणि सब काँट्रॅक्टरने यांना घेऊन मानवी तस्करी करत होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच हा गंभीर प्रकार असून त्याविरोधात पोलिसांनी आता मोठी कारवाई सुरू केली आहे. या घटनेने नागपूरमध्ये खळबळ माजली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Crime : 37 परप्रांतीय मजुरांच्या तस्करीचा डाव उधळला, 'त्या' एका पुराव्याने पर्दाफाश,नागपुरमधील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement