बंगळुरूमध्ये बायकोनं संपवलं, 36 तासात नागपुरात नवऱ्याचं आईसोबत टोकाचं पाऊल, हॉटेलमध्ये आढळले भयावह अवस्थेत

Last Updated:

नागपूर शहरातील एका हॉटेलमध्ये आई आणि मुलाने जीवन संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती चिंताजनक आहे.

News18
News18
नागपूर शहरातील एका हॉटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती चिंताजनक आहे. जयंती असं आईचं नाव असून सुरज असं मृत मुलाचं नाव आहे. दोघेही मूळचे बेंगळुरू येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन महिन्यापूर्वीच लेकाचं लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, सुरजचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. मात्र, वैवाहिक आयुष्याला फार काळ उलटत नाही, तोच सुरजच्या पत्नीने गुरुवारी बेंगळुरू येथे आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर पत्नीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले. ४० लाखांच्या हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केला. यानंतर नातेवाईकांनी बंगळुरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन देखील केलं.
advertisement
दरम्यान, बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू असतानाच सुरज आणि त्याची आई जयंती नागपूरला दाखल झाले. त्यांनी शहरातील सोनेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. इथंच हॉटेलच्या खोलीत दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने दरवाजा उघडून पाहणी केली असता ही गंभीर बाब उघडकीस आली.

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

advertisement
घटनेनंतर तात्काळ सोनेगाव पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुरजचा मृत्यू झाला, तर जयंती यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, जयंती यांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंगळुरूमध्ये बायकोनं संपवलं, 36 तासात नागपुरात नवऱ्याचं आईसोबत टोकाचं पाऊल, हॉटेलमध्ये आढळले भयावह अवस्थेत
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement