महाराष्ट्राला हादरवणारी घटना, महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो काढून ओढलं जाळ्यात अन्..

Last Updated:

नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

News18
News18
नागपूर: नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने महिला पोलिसाचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं पीडितेकडून १५ लाख ६० हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी २५वर्षीय महिला पोलीस अंमलदाराने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मॅट्रिमोनियल साईटवरून जाळ्यात अडकवलं
विकिन सूर्यभान फुलारे (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा) असं गुन्ह दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी विकिन हा आधीच विवाहित असतानाही त्याने एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वतःची खोटी माहिती भरली. त्याने स्वतःला अविवाहित आणि व्यवसायाने वकील असल्याचं भासवलं. याच खोट्या ओळखीच्या आधारे त्याने पीडित महिला पोलिसाशी संपर्क साधला. सुरुवातीला चॅटिंग आणि त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
advertisement

अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग

दोघांची ओळख वाढल्यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेशी भावनिक नातं निर्माण केलं. २८ नोव्हेंबर रोजी आरोपी नागपूरला आला. तिथे त्याने महिलेला एका लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान त्याने पीडितेचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेला मानसिक दबावाखाली आणले.
advertisement

१५ लाखांची खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी

बदनामीच्या धाकाने पीडित महिला प्रचंड दहशतीखाली आली. याचाच फायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, घरगुती अडचणी आणि इतर वैयक्तिक कारणांचे निमित्त सांगून वेळोवेळी महिलेकडून १५ लाख ६० हजार रुपये उकळले. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने आपला खरा चेहरा उघड केला. त्याने तिला किन्नरांकडून जिवे मारण्याची आणि समाजातील बदनामी करण्याची धमकी दिली.
advertisement
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राला हादरवणारी घटना, महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार, अश्लील फोटो काढून ओढलं जाळ्यात अन्..
Next Article
advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement