Nagpur News: नागपूरात पोलिसांची मोठी कारवाई,50 लाखांचा मुद्देमाल जप्त,ड्रग्ज माफियांच्या चौकडीलाच उचललं,महिला पेडलरचे नाव समोर

Last Updated:

नागपूरात ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी 'ऑपरेशन थंडर' ही मोहिम सूरू केली आहे.या मोहिमे अंतर्गत नागपुरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी धडक कारवाई केली आहे.

Nagpur News
Nagpur News
Nagpur News: वृषभ फरकुंडे, नागपूर :नागपूरात ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंगल यांनी 'ऑपरेशन थंडर' ही मोहिम सूरू केली आहे.या मोहिमे अंतर्गत नागपुरात पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यासोबत ड्रग्ज माफियांच्या चौकडीलाही ताब्यात घेतले गेले आहे. आणि एका महिला पेडलरचे नावही तपासात उघड झाले आहे.
नागपूरातील कळमना पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी धडक कारवाई करत तब्बल 50 लाखांचा एम.डी. ड्रग्ज जप्त करून चार आरोपींना अटक केली आहे.
16 सप्टेंबरला मध्यरात्री मिनीमाता नगर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान लाल रंगाच्या एम.जी. झेड.एस. ईव्ही कारमध्ये दोन संशयित फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेत आले त्यांच्या कारची झडती घेतल्यावर गाडीच्या डॅशबोर्डमधून ५.०३० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडले. त्यासह कार आणि मोबाईल मिळून १५.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
advertisement
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी अमित शर्मा आणि मुकेश तराळे यांची चौकशी केली असता त्यांनी एम.डी. खेप आयुष इंगोले याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्याच्या घरावर छापा टाकल्यावर तब्बल २१९ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, किंमत 33 लाख रुपये, जप्त झाले. पुढे आयुषने मुद्देमाल मयुर ठवकरकडून मिळाल्याचे कबूल केले, त्यालाही पोलिसांनी गंगाबाई घाट परिसरातून पकडले.
advertisement
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान एका महिला पेडलरचे नावही समोर आले असून पुढील चौकशी सुरू आहे. ऑपरेशन थंडरअंतर्गत कळमना पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News: नागपूरात पोलिसांची मोठी कारवाई,50 लाखांचा मुद्देमाल जप्त,ड्रग्ज माफियांच्या चौकडीलाच उचललं,महिला पेडलरचे नाव समोर
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement