advertisement

जिथे माओवाद्यांकडून होतो गोळीबार तिथे हिमतीनं चालवत होती जीप, बहाद्दूर 'लेडी ड्रायव्हर' निघाली लंडनला

Last Updated:

नक्षलग्रस्त सिरोंच्याची टॅक्सी ड्रायव्हर किरण कुरमावार थेट लंडनला चालली. कारण पाहून अभिमान वाटेल..

+
जिथे

जिथे माओवाद्यांकडून होतो गोळीबार तिथे हिमतीनं चालवत होती जीप, बहाद्दूर 'लेडी ड्रायव्हर' निघाली आता लंडनला

नागपूर, 8 ऑगस्ट: नक्षग्रस्त गडचिरोलीच्या दूर्गम भागात टॅक्सीचं स्टेरिंग हाती घेऊन कुटुंबाचा गाडा चालवणारी मुलगी आता थेट इंग्लंडला निघाली आहे. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठाच्या 27 वर्षीय किरण कुरमावार हिला उच्च शिक्षणासाठी समाज कल्याण विभागाने 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. त्यामुळे ती आता इंग्लंडमधील प्रतिष्ठीत लीड्स विद्यापाठातून 'इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट'चे शिक्षण घेणार आहे. तिचा हा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक असणार आहे.
नक्षलग्रस्त भागातील खडतर जीवन
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेले रेगुंठा हे अतिशय दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील गाव आहे. या ठिकाणी किरण कुरमावार हिचा जन्म झाला. किरण ज्या भागात राहते त्या भागात सूर्यास्त नंतर क्वचितच कुणी बाहेर पडत असेल. त्यामागील कारण असे की या भागात कायम नक्षली कारवायांची भीती असते. तसेच अतिशय दुर्गम असलेला हा दंडकारण्यातील भाग आहे. त्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतो.
advertisement
एक अपघात आणि किरण टॅक्सी ड्रायव्हर
नक्षलग्रस्त दूर्गम भागात राहणारी किरण ही परिसरात 'लेडी ड्रायव्हर’ म्हणून ओळखली जाते. या नावा मागील संघर्ष काहाणी देखील तितकीच प्रेरणादायी आहे. किरणचे वडील याच रेगुंठा ते सिरोंचापर्यंत टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र 2018 साली एका अपघाताने त्यांना टॅक्सी चालवणे शक्य होऊ शकले नाही. अश्या विपरीत परिस्थितीत किरणने ही जबाबदारी आपल्या हाती घेत हा कठीण मार्ग निवडला आणि स्वतः टॅक्सी ड्रायव्हर व्हायचे ठरवले. दुर्गम भागात सर्वात कमी वयातील महिला ड्रायव्हर म्हणून 'नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड्स' यांनी देखील तिची दखल घेतली आहे.
advertisement
परदेशात शिक्षण घेण्याचे होते स्वप्न
कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना किरणने एक उत्तुंग स्वप्न उराशी बाळगले होते. ते म्हणजे परदेशात उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हायचे. त्यासाठी तिने हैद्राबाद येथून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण आणि घर सांभाळणाऱ्या किरणला परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. शिक्षण आणि घराची जवाबदारी या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र शाश्वत होती ती म्हणजे दुर्दम्य धेयासक्ती. आणि त्याच जोरावर किरणने आपल्या स्वप्नांना आता गवसणी घातली आहे.
advertisement
40 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर
किरणचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे हैदराबाद विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिनं परदेशातील चार विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. त्यासाठी पूर्व परीक्षाही दिल्या. अखेर किरणचं स्वप्न सत्यात उतरलं. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किरणला लंडन येथील लीड्स विद्यापीठात 'आंतरराष्ट्रीय मार्केटींग मॅनेजमेंट'मध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यासाठी तिला तब्बल 40 लाख रुपयांची स्कॉलरशीप मंजूर झाली आहे.
advertisement
शिक्षण आणि समाजातील दुवा बनायचंय
परदेशात शिक्षण हा माझ्या आयुष्यातील पहिला टप्पा आहे. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला माझ्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचवायचे आहे. जगभरात शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी मला शिक्षण आणि समाज यातील दुवा म्हणून काम करायचे आहे, असे मत किरणने बोलताना व्यक्त केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
जिथे माओवाद्यांकडून होतो गोळीबार तिथे हिमतीनं चालवत होती जीप, बहाद्दूर 'लेडी ड्रायव्हर' निघाली लंडनला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement