Indore Gondia Flight: गोंदिया ते इंदूर अवघ्या 55 मिनिटांत, बेंगळुरूसाठी खास विमानसेवा, वेळापत्रक आणि तिकीट दर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Indore Gondia Flight: इंदूरहून गोंदियाचा प्रवास आता अवघ्या 55 मिनिटांत होणार आहे. स्टार एअरलाईन्सने बेंगळुरू आणि गोंदियासाठी खास विमानसेवा सुरू केली आहे.
मुंबई: गोंदिया ते हैदराबाद नियमित विमानसेवा सुरू असतानाच गोंदियाकरांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. ‘स्टार एअर कंपनी’ने 16 सप्टेंबरपासून गोंदिया ते इंदूर-बंगळुरू विमानसेवा सुरू केली आहे. बुधवारी बिरसी विमानतळावरून पहिले उड्डाण इंदूर आणि तेथून बेंगळुरूसाठी झाले. ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी असेल. त्यामुळे गोंदिया वासियांना अवघ्या 55 मिनिटांत इंदूरला पोहोचता येणार आहे.
कसे असेल वेळापत्रक?
इंदूर – गोंदिया विमानसेवा
इंदूरहून सायंकाळी 5 वाजता विमान झेपावणार असून सायंकाळी 5.55 वाजता गोंदियाला पोहोचेल. तर गोंदियाहून सायंकाळी 6.25 ला विमान उड्डाण घेणार असून सायंकाळी 7.20 वाजता इंदूरला पोहोचेल. या विमानसेवाचा तिकीट दर 3500 रुपये असणार आहे.
advertisement
इंदूर – बेंगळुरू विमानसेवा
गोंदियाहून आलेले विमान पुढे सायंकाळी 7.50 वाजता बेंगळुरूसाठी रवाना होईल. ते रात्री 9.45 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. तर बेंगळुरू येथून दुपारी 2.30 वाजता विमान झेपावणार असून सायंकाळी 4.30 वजाता इंदूरला पोहोचेल. या विमानाचे तिकीट 4 हजार 900 रुपये असणार आहे.
प्रवाशांना फायदा
उत्सव काळात या दोन विमानसेवांमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे. इंदूरहून गोंदियाला थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच इंदूरहून बेंगळुरूला जाणाऱ्या अतिरिक्त विमानसेवा देखील सुरू केल्या जातील, असं ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष हेमेंद्र सिंग जादौन यांनी म्हटलंय.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 18, 2025 9:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Indore Gondia Flight: गोंदिया ते इंदूर अवघ्या 55 मिनिटांत, बेंगळुरूसाठी खास विमानसेवा, वेळापत्रक आणि तिकीट दर