Loksabha Election : विदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? 'हा' पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत

Last Updated:

Loksabha Election : आपला गड शाबूत राखण्यासाठी मविआमध्ये काँग्रेसने लोकसभेच्या सहा जागांची मागणी केली आहे.

विदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
विदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
नागपूर, (उदय तिमांडे, प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष अडचणीत असताना नेहमी विदर्भ काँग्रेसच्या मागे उभा राहिले. त्यामुळे काँग्रेसचा गड अशी ओळख विदर्भाची आहे. 2019 च्या निवडणुकीत देखील राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार विदर्भातील चंद्रपूरमधून निवडून आला. त्यामुळे मविआमध्ये जागा वाटपात विदर्भात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असून 10 पैकी 6 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. आजच्या मविआच्या बैठकीत यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती आहे.
काँग्रेसची मागणी असलेल्या जागा
रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या सहा जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तर उबाठा गटाची मागणी असलेल्या जागा यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा आहे. शरद पवार गटाने वर्धा लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असली तरी यावेळी भंडारा गोंदिया ऐवजी ही जागा शरद पवार गट मागत आहे. अकोल्याची जागा वंचित आघाडीला सोडण्यावर महाविकास आघाडीत एकमत आहे.
advertisement
विदर्भात काँग्रेसने 6 जागा मागितल्यावर गेल्या निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळालेल्या यवतमाळ, वाशिम आणि बुलढण्याच्या जागेवर उबाठाने आपला दावा कायम केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा उबाठा तर अकोला वंचित आणि वर्धा लोकसभा शरद पवार गट यांना सोडण्याची तयारी मविआने केली आहे.
advertisement
काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत?
पूर्वीचा काँग्रेसचा गड असलेला विदर्भ बदलत्या परिस्थितीनुसार आता भाजपचा गड झालेला आहे. मविआमध्ये विदर्भात काँग्रेसची उबाठा आणि शरद पवार गट यापेक्षा मोठी ताकद काँग्रेसची आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसने प्रामाणिकपणे आपला मित्र पक्षांना सहकार्य केलं तर निवडणूक लढणे सोपे जाईल. 2019 च्या जागा वाटप फॉर्म्युला यंदा कायम ठेवण्याचा प्रयत्न मविआ या निमित्ताने करत आहे. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. गेल्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकसंघ असल्याने मतदार संभ्रमावस्थेत नव्हता. यंदा मात्र लढायला तुल्यबळ उमेदवार नाही, अशी स्थिती शरद पवार गट आणि उबाठाची आहे. त्यामुळे जागा वाटप फॉर्म्युलावर चर्चा करत बसून वेळ घालवण्यापेक्षा लवकर वाटप करून उमेदवार घोषित करत प्रचाराला सुरुवात करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे मविआला आवश्यक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Loksabha Election : विदर्भात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला? 'हा' पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement