रात्री उशीर झाला म्हणून रुमवर घेऊन गेला अन्..., नागपुरात तरुणीसोबत घडलं आक्रीत!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nagpur: नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३२ वर्षीय युवकाने २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
नागपूर: नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका ३२ वर्षीय युवकाने २१ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. मागील दीड वर्षांपासून आरोपी लग्नाचं आमिष दाखवून वारंवार पीडित तरुणीचं लैंगिक शोषण करत होता. पण जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा आरोपीनं पीडित तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडितेनं हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निखिल विनायक नागोसे असं गुन्हा दाखल झालेल्या ३२ वर्षीय आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २ जानेवारी २०२४ रोजी ती आणि आरोपी निखिल दोघेही कामानिमित्त उमरेड येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना, रात्री उशीर झाल्याने निखिलने तिला म्हाळगीनगर येथील आपल्या खोलीवर नेले. तिथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
advertisement
या घटनेनंतरही निखिलने अनेकवेळा हा प्रकार केला. मात्र, जेव्हा पीडित तरुणीने लग्नाविषयी विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने अखेर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि निखिल विरोधात तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी निखिल विनायक नागोसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहेत. लग्नाचं आमिष दाखवून अशाप्रकारे लैंगिक अत्याचार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 16, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
रात्री उशीर झाला म्हणून रुमवर घेऊन गेला अन्..., नागपुरात तरुणीसोबत घडलं आक्रीत!