advertisement

रस्त्यात पत्नीचा मृत्यू, कुणीच मदत करेना, तरुणाने दुचाकीवर नेला मृतदेह, नागपुरातील सुन्न करणारी घटना!

Last Updated:

Nagpur News: माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

News18
News18
माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून घेऊन जाताना दिसत आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कुणीच मदतीला आलं नाही. अनेकांना मदत मागूनही कुणी मदत केली नाही. अखेर हतबल झालेल्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाण्याचं ठरवलं. तो पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या कारमधील व्यक्तीने हा सगळा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ग्यारसी अमित यादव असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. तर अमित यादव असं पतीचं नाव आहे. दोघंही पती-पत्नी मुळचे मध्यप्रदेशातील सिवनी येथील रहिवासी आहेत. मात्र मागील १० वर्षांपासून ते कोराडी नजीकच्या लोणारा येथे वास्तव्याला होते. घटनेच्या दिवशी दोघंही रक्षाबंधन असल्याने मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होते.
advertisement
दरम्यान, ते देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत ग्यारसी या खाली पडल्या आणि बाजुने जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रकचं चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. दिवसाढवळ्या अपघात घडूनही त्यांच्या मदतीसाठी कुणी आलं नाही.
advertisement
रस्त्यावर ग्यारसी यांचा मृत्यू झाल्याचं पाहूनही कुणीच मदतीसाठी आलं नाही. कुणीही वाहनं थांबवण्यास तयार झालं नाही. या प्रकारानंतर अखेर हतबल झालेल्या अमितनेपत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि त्याच्या घरी मध्यप्रदेशात नेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मदतीची याचना करूनही कोणतंही वाहन थांबलं नाही. मात्र मृतदेह दुचाकीवर घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र भीतीने तो थांबायला तयार नव्हता. याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अमितला रोखलं आणि ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
रस्त्यात पत्नीचा मृत्यू, कुणीच मदत करेना, तरुणाने दुचाकीवर नेला मृतदेह, नागपुरातील सुन्न करणारी घटना!
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement