advertisement

Nagpur Crime : नागपुरात खळबळ! पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी पत्नीसोबत काय झालं होतं?

Last Updated:

Nagpur police head constable ends life : कौटुंबिक वादामुळे पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते.

Nagpur police head constable ends life in Ambazari lake
Nagpur police head constable ends life in Ambazari lake
Nagpur Crime news : कुणाच्या घरात वाद होत नाही. प्रत्येकाच्या कुटूंबात वाद अन् मतभेद होतच असतात. अशातच नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, अंबाझरी तलावात उडी मारून संबंधित कर्मचाऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे. 24 फेब्रुवारी रोजी ही दुर्दैवी घटना घडली असून, आज सकाळी त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.

पोरं अंबाझरी तलावात पोहोण्यासाठी आली अन्...

शिलरत्न बेलेकर अशी मृत पोलीस कर्मचाऱ्याची ओळख पटली आली असून ते वाघदरी-इसासनी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही पोरं अंबाझरी तलावात पोहोण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनंतर, त्या तरुणांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला.
advertisement

19 फेब्रुवारीपासून ड्युटीवरून गैरहजर

मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते. 19 फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या ड्युटीवरून गैरहजर होते आणि त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
advertisement

प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली

दरम्यान, आज सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला. पोलिसांनी तपास सुरू असता त्यांना मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडलं आणि त्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Crime : नागपुरात खळबळ! पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी पत्नीसोबत काय झालं होतं?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement