advertisement

Dal-Bafla Recipe : डाळ-बट्टी खाऊन कंटाळलात? बनवा टेस्टी आणि हेल्दी बाफला! रणवीर ब्रारने दिली परफेक्ट रेसिपी

Last Updated:

Perfect Dal-Bafla Recipe By Chef Ranveer Brar : आज आम्ही तुम्हाला यापैकीच बाफला कसा बनवायचा हे सांगणार आहोत. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. फक्त तुम्हाला शांतपणे सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. शेफ रणवीर ब्रार यांनी ही खास रेसिपी शेअर केली आहे.

बाफले भाजावे की तळावे? (इमेज क्रेडिट : रणवीर ब्रार युट्युब)
बाफले भाजावे की तळावे? (इमेज क्रेडिट : रणवीर ब्रार युट्युब)
मुंबई : महाराष्ट्रात डाळ बट्टी, रोडगे असे पदार्थ प्रचलित आहेत. डाळ बट्टी तर प्रत्येक मराठी घरात कधी ना कधी बनतोच. तुम्ही राजस्थानी स्पेशल दाल-बाटीदेखील खाल्ली असेल. मात्र तुम्हीच कधी दाल-बाफला खाल्ला आहे का? खरं तर बट्टी, रोडगे, बाटी आणि बाफला हे सर्व एकाच प्रकारचे अन्न आहे. मात्र त्यांना बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे.
आज आम्ही तुम्हाला यापैकीच बाफला कसा बनवायचा हे सांगणार आहोत. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. फक्त तुम्हाला शांतपणे सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. शेफ रणवीर ब्रार यांनी ही खास रेसिपी शेअर केली आहे. त्यांनी सध्या बाफल्याऐवजी मसाला बाफला कसा बनवायचा आणि त्या बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत.
हे बाफले बाफले आतून जाळीदार आणि बाहेरून अगदी कुरकुरीत बनतात. शिवाय तेलाऐवजी तुपाचा वापर केल्यामुळे हे आणखी टेस्टी लागतात. चला तर मग पाहूया टेस्टी आणि हेल्दी बाफले कसे बनवायचे.
advertisement
बाफला मसालाची तयारी
- बाफला कुरकुरीत म्हणजेच क्रिस्पी बनवण्यासाठी योग्य पीठ आणि योग्य मोहन आवश्यक आहे.
- यासाठी एका ताटात 2 कप भरड गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात सुमारे 1/3 कप रवा घाला. यामुळे बाफल्यांना चांगले टेक्श्चर मिळतो.
- आता यामध्ये थेट मोहन घालण्याऐवजी आधी पॅनमध्ये तूप गरम करा त्याकडे जिरे, बडीशेप, चिमूटभर हिंग, हळद आणि थोडी लाल तिखट घाला. हे मसालेदार तुपाचे मोहन पिठात घाला.
advertisement
- त्यानंतर मीठ आणि चिमूटभर साखर घाला. आता अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि सुमारे १ कप ताजे दही घाला. दही आणि सोडा यांचे मिश्रण बाफला आतून हलका आणि जाडसर बनवते.
- कणिक मळताना लक्षात ठेवा रवा पाणी शोषून घेतो म्हणून कणिक थोडी सैलसर मळा आणि ते झाकून ठेवा.
- कणिक 15-20 मिनिटे राहू द्या, जेणेकरून ग्लूटेन सेट होईल आणि गोळे तयार करताना जास्त भेगा पडणार नाहीत.
advertisement
बाफला शिजवण्याचे आहेत दोन पद्धती
उकळणे : बाफला शिजवण्याची पहिली पद्धत म्हणजे ते उकळणे. यासाठी मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. त्यामध्ये मीठ, थोडी लाल मिरची आणि आले घाला, जेणेकरून बाफल्याची चव वाढेल. पाणी गरम झाल्यावर बाफला घाला. जेव्हा ते वर तरंगत येतील तेव्हा ते शिजले आहेत. यानंतर ते पाण्यातून काढून घ्या.
advertisement
वाफवणे : तुम्हाला बाफले उकळायचे नसेल तर ते स्टीमर किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेऊन इडल्यांप्रमाणे वाफवून घ्या. ही पद्धत तितकीच प्रभावी आहे आणि यामध्ये बाफले अगदी व्यवस्थित फुगतात. या पद्धतीत बाफल्यांचे पोषक तत्त्वही शाबूत राहतात.
बाफले भाजावे की तळावे?
- उकडलेले किंवा वाफवलेले बाफले एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्ही ते दोन प्रकारे फिनिश करू शकता. पहिली पद्धत म्हणजे पॅनमध्ये तूप गरम करा आणि बाफले त्यामध्ये टाकून तळून घ्या.
advertisement
- दुसरी पद्धत म्हणजे गॅसवर वायर रॅकवर बाफले टाकून ते मंद आचेवर भाजून घ्या. जेव्हा बाफळे सोनेरी आणि कुरकुरीत होतात, तेव्हा ते हलके दाबा आणि तुपात बुडवा. यामुळे ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात.
advertisement
रणवीर ब्रारने या सर्व पद्धती अगदी व्यवस्थित आणि स्वोस्टारपणे समजनूं सांगितल्या आणि दाखवल्या आहेत. त्यांनी बाफल्यांसोबत डाळीची रेसिपी दिली तुम्ही त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने किंवा तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने डाळ बनवून त्यासोबत या बाफल्यांचा आनंद घेऊ शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dal-Bafla Recipe : डाळ-बट्टी खाऊन कंटाळलात? बनवा टेस्टी आणि हेल्दी बाफला! रणवीर ब्रारने दिली परफेक्ट रेसिपी
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement