advertisement

Pune News: साधंसुधं नको, घेतलं तर आलिशानच! पुणेकरांची घरखरेदीबाबतची 'चॉईस' बदलली; यंदा का आला हा नवा ट्रेंड?

Last Updated:

पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी नवीन वर्षाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली असली, तरी पुणेकरांच्या घरखरेदीच्या 'स्टाईल'मध्ये मात्र मोठा बदल पाहायला मिळत आहे.

पुण्यात घरखरेदीचा नवा ट्रेंड (AI Image)
पुण्यात घरखरेदीचा नवा ट्रेंड (AI Image)
पुणे: पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटसाठी नवीन वर्षाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली असली, तरी पुणेकरांच्या घरखरेदीच्या 'स्टाईल'मध्ये मात्र मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकूण विक्रीत घट झाली असली, तरी "घर घेईन तर आलिशानच," असा पवित्रा पुणेकरांनी घेतल्याचे ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
एकूण विक्रीत 17 टक्क्यांची घसरण
'नाईट फ्रँक इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सुरू झालेली घरांच्या विक्रीतील घसरण २०२६ मध्येही कायम आहे. जानेवारी २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यात एकूण १४ हजार २५७ घरांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा १७ हजार ४४९ इतका होता, म्हणजेच यंदा व्यवहारांत तब्बल १७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. या मंदीचा परिणाम सरकारी तिजोरीवरही झाला असून, मुद्रांक शुल्क संकलनात ५ टक्क्यांची घट होऊन ६०९ कोटी रुपये जमा झाले आहेत.
advertisement
स्वस्त घरे 'आऊट', महागडी घरे 'इन'
विक्री कमी झाली असली, तरी घरांच्या श्रेणीनुसार पाहिल्यास एक नवा ट्रेंड समोर आला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या छोट्या घरांची मागणी कमी झाली असून, नागरिक मोठ्या आणि महागड्या घरांना पसंती देत आहेत.
२५ लाखांपर्यंतची घरे: एकेकाळी या श्रेणीतील घरांचा वाटा ३२ टक्के होता, तो आता थेट २५ टक्क्यांवर घसरला आहे.
advertisement
५० लाख ते १ कोटींची घरे: मध्यम श्रेणीतील या घरांची मागणी ४ टक्क्यांनी वाढली असून ती आता २९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
आलिशान घरे (१ ते २.५ कोटी): १ कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान घरांनी मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली असून, त्यांचे प्रमाण आता १४ टक्के झाले आहे.
कुठे झाली सर्वाधिक विक्री?
पुणे शहराच्या मध्य भागात, म्हणजेच हवेली, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वाधिक ६७ टक्के व्यवहार झाले आहेत. आयटी हब आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे पश्चिम पुण्यात (मावळ, मुळशी) १६ टक्के घरांची विक्री झाली. त्यामानाने उत्तर, दक्षिण आणि पूर्व पुण्यात घरखरेदीचा उत्साह काहीसा कमी दिसून आला.
advertisement
थोडक्यात सांगायचे तर, वाढते व्याजदर आणि महागाईमुळे बजेट घरांचा ग्राहक सध्या प्रतिक्षा करत आहे, तर दुसरीकडे उच्च मध्यमवर्गीय पुणेकर मात्र सोयीसुविधांनी युक्त अशा मोठ्या आणि आलिशान घरांच्या खरेदीवर भर देत आहेत.
एकेकाळी मध्यमवर्गीय आणि बजेट घरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आता एक मोठा बदल  पाहायला मिळतोय. पुणेकरांना आता केवळ 'निवारा' नकोय, तर त्यांना हवंय एक 'लग्झरी' आयुष्य. याच कारणामुळे २०२६ मध्ये पुणेकरांच्या घरखरेदीचा कल पूर्णपणे बदलला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: साधंसुधं नको, घेतलं तर आलिशानच! पुणेकरांची घरखरेदीबाबतची 'चॉईस' बदलली; यंदा का आला हा नवा ट्रेंड?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement