काय सांगता! नागपूरच्या शिक्षिका 11 भाषांमध्ये गातात उलटं गाणं, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपण आजपर्यंत सुरबद्ध गाणं गाताना, गुणगुणताना अनेकांना ऐकलं असेल. पण सुरातच उलटं गाणं ऐकताना कुणाला पाहिलंय का?
नागपूर, 3 ऑक्टोबर: आयुष्य जगत असताना कुठला तरी छंद, कला जोपासली की जीवन अधिक समृद्ध होत असतं. त्यात संगीत हे नीरस आयुष्यात चैतन्य निर्माण करतं. त्यामुळे कोणत्याही काळात गाणं ऐकणं आणि गुणगुणनं आनंददायीच वाटतं. पण याच गाणं गुणगुण्याच्या छंदानं नागपुरातील शिक्षिकेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलीय. त्याचं कारणही तितकंच खास आहे. शिक्षिका रेखा सरदार या चक्क 11 भाषांतील गाणी उलट स्वरुपात अगदी सुरबद्ध गातात. त्यांच्या या अनोख्या छंदाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.
नागपुरातील रामदास पेठ येथे असलेल्या सोमलवर प्राथमिक शाळेत रेखा सरदार या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रेखा यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. घरी आई उत्तम गात असल्याने त्यांच्या कडूनच ही आवड माझ्यापर्यंत आली. ईश्वराच्या कृपेने चांगला स्वर मला लाभला आहे. रोज शाळेत गाडीने ये - जा करत असताना प्रवासात गाणे गुणगुणण्याचा मला छंद जडला. प्रवासाचा आनंद देखील त्यातून मला मिळत होता, असं रेखा सांगतात.
advertisement
विद्यार्थ्यांना शिकवताना मिळाली प्रेरणा
शाळेतील विद्यार्थ्यांना मी स्कॉलरशिपसाठी शिकवते. यात मिरर इमेज हा भाग आहे. मिरर इमेज शिवतानाच मला उलट लिहण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी सराव सुरू केला. सरावातून मला उलट हिलण्याची कला अवगत झाली. गाण्याचीही कला मी अशीच सरावाने अवगत केली, असे रेखा सांगतात.
advertisement
11 भाषेत गातात उलट गाणं
गाणे गात असतानाच काही तरी वेगळं करावं, असा विचार करताना उपजत ईश्वराने दिलेल्या उत्तम स्वराचा आपण वापर करून उलट गाणं गाऊन बघावं असा संकल्प केला. रोजच्या प्रवासातून मला उलट गाणं गाण्याची कल्पना सुचली. मी तसा प्रयत्न सुरू केला. प्रयत्नातून आणि नियमित सरावानं ही कला मी विकसित केली. आज मी तब्बल 11 भाषेत उत्तम गाणं गावू शकते, अशी माहिती रेखा सरदार यांनी दिली.
advertisement
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
सुरुवातीला मी माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी ही कला जोपासली. मात्र, अल्पावधीतच त्याचे साऱ्यांनी कौतुक केलं आणि मला अनेकांनी प्रोत्साहित केलं. आज माझ्या या छंदाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, सावित्रीबाई फुले बेस्ट अवॉर्ड सारख्या अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासह मी मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात देखील गाण्याचे कार्यक्रम केले आहे, असे रेखा सांगतात.
advertisement
छंदातून इतरांना प्रोत्साहन
शाळेतील विद्यार्थ्यांकडून मला नवीन गाण्यांची नावे कळत असतात. त्यांच्याकडून मी नवी गाणे गाण्याचा देखील प्रयत्न करत असते. दैनंदिन जीवनात आपण प्रगतीच्या वाटेवर स्वार होऊन सुसाट वेगाने पुढे जात आहोत. मात्र, सुखाची व्याख्या जरी प्रत्येकाची वेग वेगळी असली तरी कला किंवा कुठलातरी छंद माणसांचे आयुष्य समृद्ध करत असतो. मी माझ्या या छंदाच्या रूपाने इतरांना देखील छंद जोपसण्यासाठी प्रोत्साहित करते, अशी माहिती रेखा सरदार यांनी दिली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 03, 2023 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
काय सांगता! नागपूरच्या शिक्षिका 11 भाषांमध्ये गातात उलटं गाणं, Video