advertisement

गावात जायला रस्ता नाही पण बीडच्या अविनाशनं केला गोल्ड मेडलचा अडथळा पार!

Last Updated:

घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या पावलापासूनच संघर्ष करणाऱ्या अविनाशनं गोल्ड मेडल पटकावलंय.

+
News18

News18

बीड, 2 ऑक्टोबर : बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं मांडवा हे गाव फारसं कुणाला माहिती नसेल. एखाद्या टिपिकल ग्रामीण भागातील गावांसारखं हे गाव आहे. या गावात जायला नीट रस्ता देखील नाही. त्यामुळे अगदी घरातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या पावलापासूनच गावकऱ्यांचा संघर्ष सुरू होतो. या संघर्षाचा सामना करत मोठ्या झालेल्या अविनाश साबळेनं गावाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलंय.
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत अविनाशनं 3 हजार मीटर स्टिपलचेस स्पर्धेच गोल्ड मेडल पटकावलंय. गेल्या काही वर्षांपासून अविनाश या प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. त्याच्याकडून या आशियाई स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा होती. अविनाशनं ही अपेक्षा पूर्ण करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातलीय. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष आहे.
advertisement
अविनाशच्या या यशानं मांडवात राहणारे त्याचे आई-वडिल तसंच सर्व गावकरी हरखून गेलेत. या गावकऱ्यांनी अविनाशच्या आई-वडिलांचा सत्कारही केला. 'अविनाशने सुवर्णपदक पटकावल्यानंतर याची माहिती आम्हाला बातम्यांच्या माध्यमातून कळाली आणि आनंदाने माझ्या अंतकरण हे भरून आले कष्ट करून आज त्याने खरोखरच देशाचे नाव कमावले आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय,' अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय.
advertisement
कसा घडला अविनाश?
अविनाशच्या कामगिरीचा त्याच्या आई-वडिलांसह संपूर्ण देशाला अभिमान वाटतोय. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या कामगिरीनं वेधून घेणाऱ्या अविनाशचा सुरुवातीचा प्रवास खडतर होता. त्याचे वडिल शेतकरी असून त्यांची चार एकर शेती आहे. घरातली परिस्थिती बेताचीच. गावातील जिल्हा परिषद शाळेत त्यानं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलंय.
शाळेतच त्याला खेळाची आवड निर्माण झाली. या आवडीमुळेच त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. स्टीपलचेस सारख्या खडतर क्रीडा प्रकारात तो आज देशाची ओळख बनलाय.
advertisement
अविनाशनं स्वत:च्या कष्टाच्या जोरावर या सर्व गोष्टी मिळवल्यात. त्याचं पंतप्रधानांपासून सर्वजण कौतुक करतायत. त्याच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केलीय. अविनाश लहाणपणासून खेळासोबत शाळेच्या अभ्यासातही हुशार होता. त्यानं काहीही घडलं तरी आपला फोकस ढळू दिला नाही, अशी आठवण त्याच्या आईनं सांगितली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
गावात जायला रस्ता नाही पण बीडच्या अविनाशनं केला गोल्ड मेडलचा अडथळा पार!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement