Nagpur Water: नागपूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस पुरवठा बंद राहणार, कारण काय?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Nagpur Water Supply: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात पाणी जपून वापरावं लागणार आहे. 20 सप्टेंबरपासून पुरवठा बंद राहील.
नागपूर: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांच्या संयुक्त नियोजनानुसार, मेडिकल फीडरवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रविवारी म्हणजेच 21 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत पुरवठा बंद राहील. हा निर्णय कॉटन मार्केट चौक व लोहा पुलाजवळ मेडिकल फीडरचे अमृत योजनेअंतर्गत नव्या फीडरशी इंटरकनेक्शन करण्यासाठी घेण्यात आला आहे. प्रशासनाने या कामाला प्राधान्य दिले असून यामुळे परिसरात पाणीपुरवठा तात्पुरता ठप्प राहणार आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
मेडिकल फीडर कमांड क्षेत्र: मेडिकल रुग्णालय व आजूबाजूचा परिसर, टी.बी. वॉर्ड, एसईसीआर रेल्वे परिसर, टाटा कॅपिटल, रामबाग कॉलनी, राजाबक्षा, इंदिरानगर, जाटारोडी क्र. 3, अजनी रेल्वे स्टेशन परिसर, रामबाग म्हाडा, शुक्ला आटा चक्की परिसर, उंटखाना, ग्रेट नाग रोड, बोरकर नगर आणि बारा सिग्नल इत्यादी भागांत पाणीपुरवठा होणार नाही.
advertisement
गॉदरेज आनंदम कमांड क्षेत्र: दक्षिणामूर्ती चौक, पाताळेश्वर रोड, बिंझाणी महिला शाळा, कोतवाली पोलिस चौकी, पंचांग गल्ली, छोटा राम मंदिर, जुने हिस्लॉप कॉलेज परिसर, अत्तर ओळी, रामजीची वाडी, कर्नलबाग, तेलीपुरा, गाडीखाना, जुनी शुक्रवारी आणि जौहरीपुरा या भागांनाही पाणीपुरवठ्याचा त्रास होणार आहे.
advertisement
मनपा व ऑरेंज सिटी वॉटरने नागरिकांना या अचानक होणाऱ्या असुविधेबाबत सज्ज राहण्याचे आणि आवश्यकतेनुसार पाणी आधीपासूनच साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मेडिकल रुग्णालये, क्लिनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री आणि सार्वजनिक सुविधा या ठिकाणी आधीच पर्यायी पाणीव्यवस्था उपलब्ध करून ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे. कामानंतर पाणीपुरवठा काही वेळापर्यंत टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होऊ शकतो; त्यामुळे पाण्याचा वापर संयमाने करावा, असेही सांगितले गेले आहे.
advertisement
प्रशासनाकडून या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अधिक माहिती व अद्ययावत सूचना मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या किंवा ऑरेंज सिटी वॉटरच्या अधिकृत जाहिराती व स्थानिक सूचना लक्षात घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
Sep 19, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Water: नागपूरकर पाणी जपून वापरा, 2 दिवस पुरवठा बंद राहणार, कारण काय?









