Indian Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! नांदेड ते हडपसर विशेष रेल्वेचा मार्ग बदलला; जाणून घ्या कोणते असतील थांबे?

Last Updated:

Nanded-Hadapsar Special Train : नांदेड ते हडपसर दरम्यान नवीन विशेष रेल्वे गाडी बार्शी कुर्डूवाडी मार्गे धावणार आहे. प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि जलद प्रवासाची संधी उपलब्ध होणार तसेच स्थानिक आणि नियमित प्रवाशांना मोठा आराम मिळणार आहे.

आता बार्शी - कुर्डूवाडी मार्गे धावणार नांदेड हडपसर विशेष रेल्वे गाडी
आता बार्शी - कुर्डूवाडी मार्गे धावणार नांदेड हडपसर विशेष रेल्वे गाडी
सोलापूर  : मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नांदेड हडपसर विशेष गाडी सोलापूर रेल्वे विभागामार्फत चालवण्यात येणार असून या गाडीचे नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. महत्त्वाचा म्हणजे ही गाडी बार्शी, कुर्डूवाडी मार्गे धावणार असून सोलापुरातील प्रवाशांना या विशेष रेल्वे गाडीचा चांगलाच फायदा होणार असून वेळही वाचणार आहे.
वेळापत्रक जाणून घ्या
नांदेड - हडपसर विशेष गाडी गाडी क्रमांक 07607 साप्ताहिक विशेष गाडी 21 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 08:30 मिनिटाला नांदेडहून निघणार आणि त्याच दिवशी रात्री 09:40 मिनिटाला हडपसरला पोहोचणार आहे. तर या गाडीचे एकूण 2 फेऱ्या होणार आहे. तर उलट दिशेने साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक 07608 21ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10:40 मिनिटाला निघणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 मिनिटाला नांदेडला पोहोचणार असून या साप्ताहिक विशेष गाडीचे एकूण 2 फेऱ्या होणार आहे.
advertisement
असे असणार विशेष गाडीला थांबे
नांदेड - हडपसर या विशेष गाडीला पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर, लातूर रोड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, आणि दौंड असे या गाडीला थांबे असणार आहे. गाडीची रचना 1 फर्स्ट एसी, 2एसी-II टियर, 6 एसी-III टियर, 1एसी हॉट बुफे कार, 6 स्लीपर क्लास, 4जनरल सेकंड क्लास आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅन. (22 कोच) प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घेत वैद्य तिकिटासह प्रवास करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indian Railway : प्रवाशांनो लक्ष द्या! नांदेड ते हडपसर विशेष रेल्वेचा मार्ग बदलला; जाणून घ्या कोणते असतील थांबे?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement