Nanded : विद्यार्थिनिला अश्लिल Video पाठवल्याचा आरोप, नांदेडच्या मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं

Last Updated:

विद्यार्थिनीने अश्लिल व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे.

विद्यार्थिनिला अश्लिल Video पाठवल्याचा आरोप, नांदेडच्या मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं
विद्यार्थिनिला अश्लिल Video पाठवल्याचा आरोप, नांदेडच्या मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : विद्यार्थिनीने अश्लिल व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे. नांदेडच्या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला, यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष प्यायलं, त्याआधी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली.
advertisement
नांदेड शहराजवळच्या पासदगाव येथील पुष्पांजली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल कारांमुंगे यांच्यावर त्याच शाळेतल्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ पाठवल्याचा आरोप होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुरूवारी सुनिल कारामुंगे यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर शुक्रवारी दुपारी आरोपी सुनिल कारामुंगे यांनी विष प्यायलं, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विष घेण्याआधी सुनिल कारामुंगे यांनी एक चिठ्ठीही लिहिली होती. पीडित मुलीच्या कुटुंबाने माझा मानसिक छळ केला, त्यामुळे आपण विष पिऊन जीवन संपवत आहे, असं त्यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. दरम्यान पोलीस या चिठ्ठीची सत्यता पडताळून पाहत आहेत. दुसरीकडे मुख्याध्यापक सुनिल कारामुंगे यांच्या कुटुंबियांनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुलगी आणि तिच्या कुटुंबाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded : विद्यार्थिनिला अश्लिल Video पाठवल्याचा आरोप, नांदेडच्या मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement