Nanded: सोनू कल्याणकर खून प्रकरणात नवा ट्विस्ट, प्रेम संबंध आणि बहिणीची सोयरिक तोडल्याने बदला घेतला?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नांदेड शहरात सोनु कल्याणकर याची चार जणांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. सोनु कल्याणकर याच्या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी काही तासात अटक केली. याच खून प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
नांदेड : नांदेड शहरातील श्रीनगर भागात आज सकाळी अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. चार जणांनी धारदार शस्त्राने वार करुन सोनु कल्याणकर याची हत्या केली. सोनु कल्याणकर याच्या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी काही तासात अटक केली. एक आरोपी अंकुश गंदमवार याचा पाठलाग करताना त्याने पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपी अंकुश गंदमवार याच्यावर गोळी झाडून त्याला जखमी केले. जुन्या वादातून सोनु कल्याणकर याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली.
कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंघ संधु उर्फ रिंदा यांच्या गंगचा सदस्य असेलला मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे हा सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनू कल्याणकर यांचे वडील अशोक कल्याणकर यांनी केला. तशी फिर्याद अशोक कल्याणकर यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन भाग्यनगर पोलिसांनी गोलू मंगनाळे याचे वडील चंद्रविजय मंगनाळे, रोहित लोट, पियूष शिंदे, अंकुश गंदमवार, मधू जोगदंड या सहा जणांवर गून्हा दाखल केला.
advertisement
प्रेम संबंध आणि सोयरिक मोडल्याचे प्रकरण
सोनु कल्याणकर याचे गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाला गोलू मंगनाळे आणि त्याच्या कुटुंबाचा विरोध होता. 2020 साली त्या तरुणीचा साखरपुडा झाला. तो साखरपुडा सोनू कल्याणकर याने मोडला, असा मंगनाळे कुटुंबाला संशय होता. त्यावरुन दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2021 साली गोलू मंगनाळे याने सोनू कल्याणकर याच्यावर त्याच्या राहत्या घरी जाऊन गोळी झाडली. या हल्ल्यातून सोनु कल्याणकर थोडक्यात बचावला.
advertisement
नंतर एप्रिल 2022 साली नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खंडणी न दिल्याने रींदा गँगने संजय बियाणी यांची हत्या केली. याच प्रकरणात गोलू मंगनाळे याला देखील अटक करण्यात आली. खून , एमपीडीए, मोक्कामध्ये गोलू सध्या तुरुंगात आहे. मात्र बहिणीचे प्रेम संबंध असल्याचा कारणावरून त्यानेच सोनू कल्याणकर याची हत्या घडवली असा आरोप सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी केला.
advertisement
सोनू कल्याणकर याची हत्या करणाऱ्या आरोपींनी काही दिवसांपूर्वी त्याला धमकी देखील दिली होती. त्याबाबत आपण तक्रार करू असे सोनु कल्याणकर याच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र धमकी देणारे आरोपी हे रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याचे मित्र आहेत, तक्रार केली तर मला जीवे मारतील असे सोनू कल्याणकर याच्या वडिलांना म्हणाला होता. याच कारणावरून सोनू कल्याणकर याची हत्या झाल्याची फिर्याद त्याचे वडील अशोक कल्याणकर यांनी दिली. विशेष म्हणजे तुरुंगात असुन गोलू मंगनाळे याने ही हत्या घडवली असेल तर ही गंभीर बाब आहे. एकप्रकारे त्याने खाकी वर्दीला आव्हानच दिले आहे. पोलीस त्याची गुन्हेगारी कशी मोडून काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 8:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded: सोनू कल्याणकर खून प्रकरणात नवा ट्विस्ट, प्रेम संबंध आणि बहिणीची सोयरिक तोडल्याने बदला घेतला?








