Narayan Rane: नारायण राणे यांना स्टेजवर भोवळ, डायसवरून खुर्चीकडे जाताना आली चक्कर

Last Updated:

नारायण राणेंना चिपळूण येथील कार्यक्रमात स्टेजवरच भोवळ आल्याने मोठी खळबळ उडाली.

News18
News18
राजेश जाधव, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग  : भाजपचे केंद्रीय मंत्री खासदार नारयण राणेंना चिपूळणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात भोवळ आली. नारायण राणेंना भोवळ आल्याने मोठी खळबळ उडाली. या कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी निलम राणेही उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांच्या सुरक्षरक्षकांनी त्यांना तात्काळ खुर्चीवर बसवले आणि पाणी दिले.
चिपळूण मधील कृषी व पशुधन प्रदर्शन 2026 च्या कृषी महोत्सव वेळी उद्घाटन प्रसंगी भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ आली. भोवळ आल्याने काही मिनिटे पत्नी समवेत बसून त्यांनी विश्रांती घेतली आणि मग ते दुसऱ्या कार्यक्रमास परतले. यावेळी स्टेजवर भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, भास्कर दानवे, संतोष दानवे उपस्थित होते.
advertisement

नेमकी कशामुळे आली भोवळ? 

चिपळूणच्या सभेला संबोधित केल्यानंतर नारायण राणेंना भोवळ आली. सध्या चिपळूणमध्ये प्रचंड तापामानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. ऊन सहन न झाल्याने भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या भाषणानंतर ते दुसऱ्या कार्यक्रमाला रवाना झाला.  सभेतच हा प्रकार घडल्याने थोडा वेळ सर्वांना चिंता वाटली. मात्र . सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेले.
advertisement

नारायण राणेंचे निवृत्तीचे संकेत

नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. राणे यांनी म्हटले आहे की, सध्या दोन्ही चिरंजीव काम करत आहेत, आता थांबायला पाहिजे. आपले वय आणि शारीरिक मर्यादांचा उल्लेख करत त्यांनी राजकारण सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. नारायण राणे यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना राजकारणातून मुक्त करण्याची विनंती देखील केली.
advertisement
राज्यसभा किंवा लोकसभा नको असून त्यांना आपला व्यवसाय करायचा असल्याचे नड्डा यांना स्पष्ट सांगितले. मात्र नड्डा यांनी त्यांची ही विनंती मान्य केली नाही. राणेजी, हम आपको छोडनेवाला नही है, असे म्हणत नड्डा यांनी राणेंना राजकारणात सक्रिय राहण्याची विनंती केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Narayan Rane: नारायण राणे यांना स्टेजवर भोवळ, डायसवरून खुर्चीकडे जाताना आली चक्कर
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement