T20 World Cup 2026 : बांगलादेशचे सामने आयसीसीने भारताबाहेर ठेवले तर, BCCI ला किती कोटींचं नुकसान होईल?

Last Updated:
Bangladesh T20 World Cup 2026 Matches : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावित बदलामुळे बीसीसीआयच्या तिजोरीवर काय परिणाम होईल? तुम्हाला माहितीये का?
1/7
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या नियोजित वेळापत्रकात बांगलादेशने आपल्या वाटणीच्या मॅचेस भारताबाहेर हलवण्याची विनंती केल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल, याबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

advertisement
2/7
बांगलादेशचे सामने प्रामुख्याने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार होते. मात्र, या बदलामुळे बीसीसीआयच्या केंद्रीय महसुलावर (प्रसारण हक्क) कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

3/7
बांगलादेशचे ग्रुप-सी मधील तीन सामने ईडन गार्डन्सवर आणि एक सामना वानखेडेवर होणार होता. ईडन गार्डन्सची क्षमता 63,000 तर वानखेडेची 33,000 असून, चार सामन्यांसाठी सुमारे 2.22 लाख तिकीटांची उपलब्धता होती.

4/7
आयसीसीच्या वेबसाइटनुसार, या सामन्यांची तिकीटे 100 ते 300 रुपयांपासून सुरू होतात. जर हे सामने भारताबाहेर गेले आणि तिथे इतर कोणत्याही देशाचे सामने झाले नाहीत, तर गेट मनी (तिकीट विक्री) मधून मिळणाऱ्या सुमारे 7 ते 30 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागू शकते.

5/7
आयसीसीच्या नियमांनुसार, तिकीटांची मालकी ही आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन (IBC) कडे असते. बीसीसीआय केवळ होस्ट म्हणून काम करते. बीसीसीआयला तिकीट विक्रीतून थेट नफा मिळण्याऐवजी, 'होस्टिंग फी' आणि 'ऑपरेटिंग अरेंजमेंट' द्वारे मोबदला मिळतो.

6/7
त्यामुळे बीसीसीआयचा खरा तोटा हा मॅच-डे मधील अतिरिक्त उत्पन्न, स्थानिक प्रायोजकत्व आणि हॉस्पिटॅलिटी डिमांडशी संबंधित असेल. त्यामुळे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर परिणाम होईल, याची शक्यता फार थोडी आहे.

7/7
दरम्यान, थोडक्यात सांगायचं झालं तर, हा तोटा वर्ल्ड कपच्या मुख्य महसुलाचा भाग नसून, केवळ चार सामन्यांच्या स्थानिक उत्पन्नाशी संबंधित आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या एकूण आर्थिक ताकदीवर याचा कोणताही गंभीर परिणाम होणार नाही.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement