Western Railway : मुंबईहून गावाकडे जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नव्या वर्षात या ट्रेनचा प्रवास ठरणार खास; कारण...
Last Updated:
Western Railway : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी तेजस राजधानी, शताब्दी आणि स्वर्ण जयंती राजधानी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अतिरिक्त वातानुकूलित डबे जोडले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत गाड्या अधिक डब्यांसह धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरूवातीस प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे पश्चिम रेल्वेवर राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानी, मुंबई-अहमदाबाद शताब्दी आणि साबरमती-नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे.
मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
गाडी क्रमांक 12951/52 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानीत आता तृतीय वातानुकूलित डबा आहे, ज्यामुळे ही गाडी 22 डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक 12957/58 साबरमती-नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानीला एक अतिरिक्त वातानुकूलित डबा जोडण्यात आला असून ती 23 डब्यांसह धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक 12009/10 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला एक अतिरिक्त वातानुकूलित चेअर कार जोडण्यात आली आहे, ज्यामुळे ती 22 डब्यांसह धावणार आहे.
advertisement
ही अतिरिक्त डबे 31 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहेत. राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमधील थांबे किंवा वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेषतहा अहमदाबाद कॉरिडोर हा मार्ग नेहमीच गर्दीचा असतो, त्यामुळे प्रवाशांना या अतिरिक्त डब्यांमुळे खूप दिलासा मिळणार आहे. मागील महिन्यात इंडोगी विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळेही या मार्गावर अतिरिक्त डबे चालवण्यात आले होते.
advertisement
मुंबई, गुजरात, बडोदा आणि अहमदाबादकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हे अतिरिक्त डबे प्रवास अधिक आरामदायक आणि सोयीचे करतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 2:15 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway : मुंबईहून गावाकडे जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नव्या वर्षात या ट्रेनचा प्रवास ठरणार खास; कारण...









