का झाल्या धर्मेंद्र यांच्या 2 शोकसभा? निधनाच्या 40 दिवसांनी हेमा मालिनी यांनी सांगितलं खरं कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबात दोन शोकसभा, हेमा मालिनी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना सभा घेतली. त्यांनी असं का केलं असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर हेमा मालिनी यांनी यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला जवळपास दोन महिने होऊन गेले आहेत. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. चाहत्यांना धर्मेंद्र यांचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही. त्यांच्या निधनाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








