नेम चुकला! सिंहाला बेशुद्ध करायला गेले आणि माणसाचा मृत्यू झाला
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lion Attack : सिंहाने एका लहान मुलावर हल्ला केल्यानंतर वनविभागाची टीम या सिंहाला पकडण्यासाठी गेली. त्यासाठी सिंहाला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन मारण्यात आलं पण ते चुकून वन कर्मचाऱ्यालाच लागलं.
सिंह किंवा वाघाला बेशुद्ध करायचं इंजेक्शन मारायचं होतं आणि चुकून ते वन कर्मचाऱ्यालाच लागलं. फिल्मी वाटावा असा सीन... कित्येक फिल्ममध्ये तुम्ही हा सीन पाहिला असेल. पण असं प्रत्यक्षात घडलं ते गुजरातमध्ये. सिंहाला बेशुद्ध करायचं इंजेक्शन चुकून वन कर्मचाऱ्यालाच लागलं. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
advertisement
कुटुंबाने तात्काळ फॉरेस्ट डिपार्टमेंटला याची माहिती दिली. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. शेत परिसरात आणि आजूबाजूच्या झुडपांमध्ये शोधमोहीम राबवली. या शोधादरम्यान मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या. तपासणीत हा हल्ला सिंहानेच केल्याचं स्पष्ट झालं. मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement
या घटनेनंतर वनविभागाने सिंहाला पकडण्यासाठी तात्काळ ऑपरेशन सुरू केलं. टीमने सिंहाला पकडण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. सिंह शेतात लपलेला होता. त्याला पकडण्यासाठी ट्रँक्विलायझर गनचा वापर करण्यात आला. ज्यामार्फत प्राण्यांना बेशुद्ध करायचं इंजेक्शन दूरहून मारलं जातं. मात्र दुर्दैवाने या गनमधील इंजेक्शन सिंहाला न लागता चुकून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यालाच लागलं. (प्रतीकात्मक फोटो)
advertisement









