एक दोन नव्हे तब्बल 40 वार, रक्तरंजित थराराने हादरली डोंबिवली, तरुणीसह तिघांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे जिल्ह्याच्या डोबिंवलीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने तब्बल ४० हून अधिक वार केले.
ठाणे जिल्ह्याच्या डोबिंवलीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने तब्बल ४० हून अधिक वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नरेंद्र उर्फ काल्या जाधव असं हत्या झालेल्या ३७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर आकाश गौरीशंकर बिराजदार, दिवाकर गुप्तासह एका तरुणीला अटक केली आहे. रविवारी रात्री आरोपींनी आयरे गावात काल्या जाधवला गाठून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तू इथं का आलास? इथून आता जीवंत जाऊ देणार नाही, असं म्हणत आरोपींनी काल्यावर हल्ला केला. चाकू आणि लोखंडी रॉडने ४० हून अधिक वार केले. यावेळी काल्याचा एक मित्र शुभम वादात मध्यस्थी करायला गेला. तेव्हा आरोपींनी त्यालाही धमकी दिली.
advertisement
खून करून पसार झालेल्या दोन पुरुषांसह एका तरुणीला रामनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र उर्फ काल्या जाधव याचे काही दिवसांपूर्वी एका आरोपीशी भांडण झालं होतं. यानंतर त्यांच्यात हाणामारीही झाली होती. याच घटनेचा राग मनात ठेवून आरोपींनी १३ डिसेंबर रोजी रात्री आपल्या साथीदारांसह नरेंद्रवर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. भर गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारे तरुणाची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक दोन नव्हे तब्बल 40 वार, रक्तरंजित थराराने हादरली डोंबिवली, तरुणीसह तिघांना अटक









