advertisement

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय, कॅप्टनच्या अडचणीत वाढ!

Last Updated:

Nashik Court Ashok Kharat: महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला हजर करण्यात आले.चेहऱ्यावर काळा बुरखा बांधून त्याला न्यायालयात आणले गेले.

अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत वाढ
अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत वाढ
नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या ७ दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत अशोक खरात याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर खरातने नाशिक येथील त्याच्या कार्यालयात अत्याचार केले. याविरोधात पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खरात यास अटक झाली. नाशिक पोलिसांच्या आवाहनानंतर अनेक पीडित महिला तक्रारीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. खरातची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी वाढवली.
advertisement

सरकारी वकिलांनी काय काय सांगितले?

विशेष पोलीस पथकातील अधिकारी सूर्यवंशी यांनी न्यायालयाला खरात याच्यासंदर्भाने माहिती दिली. अशोक खरात हा स्वत:ला सिद्ध पुरूष म्हणवून घ्यायचा. येणाऱ्या महिलांना तो पेढा आणि विशेष प्रकारचे पाणी प्यायला द्यायचे. ६ लाख ५३ हजारांची रोकड आणि लॅपटॉप जप्त केला, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. तसेच खरात याच्या फार्महाऊसवर पिस्तुलाच्या ५ पुंगळ्या सापडल्याचेही त्यांनी सांगितले. खरातने नरबळी दिल्याचा संशयही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. खरात वाघ आणि साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा. हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा. खरात प्रकरणी वन कायदा देखील लागू शकतो, असे न्यायालयाच्या निर्दशनास सरकारी वकिलांनी आणून दिले. ईशानेश्वर मंदिरातील सिद्धपूजेचा तपास बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी केली. खरात नेमकी कोणती पूजा करायची, विधी कसे आणि कोणते होते, याची चौकशी करणे बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
advertisement

खरातचे वकिलांनी काय युक्तिवाद केला?

खरात प्रकरणात पेन ड्राईव्हचा कुठेही उल्लेख नाही. एसआयटीचा तपास झाला आहे. त्याच्याकडून कोणतेही कागदपत्रे हस्तगत करण्याचे बाकी नाही. त्यामुळे खरातला पुन्हा पोलीस कोठडी वाढविण्याची गरज नाही, असे खरातच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय, कॅप्टनच्या अडचणीत वाढ!
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement