Summer Tips : महागडा एसी आणि हजारोंचं लाईट बिल वाचेल, 'या' ट्रिक्स तुमचं घर ठेवतील थंडाथंडा-कूलकूल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात आपलं घर खूप तापतं. यामुळे बरेच लोक एसी वापरतात. पण एसी सर्वांनाच परवडतो असं नाही. शिवाय काही लोकांना तर एसीचा गारवा सहनही होत नाही. अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं घर थंड ठेऊ शकता.
advertisement
सर्वात आधी तर घर थंड राहावं यासाठी घरात सूर्यप्रकाश येऊ देऊ नका. त्यासाठी घराचे दारं आणि खिडक्या यामधून थेट सूर्यप्रकाश येत नाही ना हे तपासा. घरात थेट सूर्यप्रकाश आला तर घर लवकर गरम होतं. म्हणून खिडक्यांवर हलक्या रंगाचे पडदे किंवा ब्लाइंड्स लावा. तुम्हाला जास्त ठिकाणी हे पडदे लावायचे नसतील तर ज्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी लावा. या पडद्यांमुळे सूर्याची उष्णता घरात येत नाही. तुमचं घर बऱ्यापैकी थंड राहतं.
advertisement
पडदे लावल्यानंतर घरात फार उष्णता राहत नाही तरीदेखील काही प्रमाणात घर तापतंच. या परिस्थितीत तुम्ही रात्रीच्या गार हवेचा वापर करू शकता. रात्रीच्या किंवा संध्याकाळच्यावेळी गार वारं वाहतं. तेव्हा घराचे दार खिडक्या उघडा आणि हे वार आत येऊ द्या. याने घर खूप अंशी थंड होईल. याला क्रॉस-व्हेंटिलेशनदेखील म्हणतात. यावेळी तुम्ही घरात पंखा चावू शकता. ज्याने घर कमी वेळात थंड होईल.
advertisement
उन्हाळ्यात पंखा वापरावा हे काही वेगळं सांगण्यासारखं नाही. पण तुम्ही सिलिंग फॅनसोबत टेबल फॅनचाही वापर केलात तर तुमचं घर थंड राहील. टेबल फॅन घरात अशा ठिकाणी ठेवा जिथून गार वारं येतं. तुम्ही तो खिडकीजवळही ठेऊ शकता. त्याचबरीबर तब्बल फॅन ठेवल्यानंतर त्यासमोर थंड पाणी किंवा फार्फाचे खडे ठेवा. यामुळे थंड हवा घरामध्ये पसरेल आणि घर लवकर थंड होईल.
advertisement
advertisement
advertisement
हा उपाय सर्वांना महित असेलच. जिथे झाडं असतात तिथे गारवा आणि आल्हाददायक वातावरण असतं. घरात तुम्ही छोटी छोटी रोपं लावल्यासही तुम्हाला हाच आनंद मिळू शकतो. घरात घरात भरपूर इनडोअर झाडे लावा. यामुळे घर छान तर दिसेलच सोबतच ते थंडही राहील. तुम्ही कोरफड आणि स्नेक हे प्लांट घरात ठेऊ शकता. ही रोपं बाल्कनी किंवा खिडकीजवळ लावल्यास ते हवा शुद्ध करतात तापमानही कमी करतात.
advertisement
बरेच लोक उन्हाळ्यात गारव्यासाठी अंथरुणावर पाणी शिंपडतात कारण पाण्याने घर बऱ्यापैकी थंड होऊ शकतं. म्हणून तुम्ही पाण्याचा इमारत वापर करून घर थंड ठेऊ शकता. यासाठी संध्याकाळी घरात फरशीवर थोडं पाणी शिंपडा किंवा पडदे थोडे ओले करा. जेव्हा हवा सुरु असते आणि त्या पाण्यापासून वाहते. तेव्हा सभोवतालचा भाग थंड हाऊस लागतो. पण पाण्याचा वापर कमी प्रमाणातच करा.
advertisement










