नाशिक महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

Last Updated:

Nashik Election 2026 : महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ७२ जागांवर विजय मिळवत भाजपने नाशिक महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे नाशिकचा महापौर भाजपचाच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Nashik Election 2026
Nashik Election 2026
नाशिक : महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ७२ जागांवर विजय मिळवत भाजपने नाशिक महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे नाशिकचा महापौर भाजपचाच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र हे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याबाबतचा निर्णय आज निश्चित झाला असून नगरविकास खात्याकडून आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीनुसार खुल्या प्रवर्गातून महिला महापौर होणार आहे.
पक्षांतर्गत हालचालींना वेग
भाजपमधील इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. विविध पातळ्यांवरून पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते आणि संघटनात्मक नेतृत्वाकडे मोर्चेबांधणी सुरू आहे. महापौरपदासाठी उमेदवार ठरवताना पक्षातील ज्येष्ठता, महापालिकेतील अनुभव, पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामगिरी, वरिष्ठांशी असलेली जवळीक आणि शिफारसी या सर्व बाबींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
खुला प्रवर्गातून कोण दावेदार 
सुरेश पाटील – दुसऱ्यांदा नगरसेवक
advertisement
दिनकर पाटील – चौथ्यांदा नगरसेवक
राजेंद्र महाले – तिसऱ्यांदा नगरसेवक
खुल्या प्रवर्गातील महिला दावेदार
हिमगौरी आडके – दुसऱ्यांदा नगरसेवक
दीपाली कुलकर्णी – तिसऱ्यांदा नगरसेवक
स्वाती भामरे – दुसऱ्यांदा नगरसेवक
ओबीसी प्रवर्गातून पुरुष दावेदार
सुधाकर बडगुजर - चौथ्यांदा नगरसेवक
चंद्रकांत खोडे - चौथ्यांदा नगरसेवक
मच्छिंद्र सानप - प्रथम नगरसेवक
ओबीसी प्रवर्गातून महिला दावेदार
दीपाली गिते - प्रथम नगरसेवक
advertisement
सुप्रिया खोडे - प्रथम नगरसेवक
आदिती पांडे - प्रथम नगरसेवक
एसी प्रवर्गातून पुरुष दावेदार
राजू आहेर - प्रथम नगरसेवक
प्रशांत दिवे - दुसऱ्यांदा नगरसेवक
भगवान दोंदे - दुसऱ्यांदा नगरसेवक
एसी प्रवर्गातून महिला दावेदार
रुपाली नन्नावरे - प्रथम नगरसेवक
सविता काळे - दुसऱ्यांदा नगरसेवक
कोमल मेहेरोलिया - दुसऱ्यांदा नगरसेवक
प्रतिकूल परिस्थिती आणि महाजनांची 'फिल्डिंग'
निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी चित्र फारसे सुखावह नव्हते. उमेदवारी वाटपावरून झालेला गोंधळ, निष्ठावंतांची नाराजी आणि तपोवनातील वृक्षतोडीचा गाजलेला मुद्दा, यामुळे भाजप बॅकफुटवर जाईल असे वाटत होते. त्यातच भाजपच्या स्वतःच्या आमदारांनीही प्रचारातून अंग काढून घेतल्याने ही लढाई 'गिरीश महाजन विरुद्ध नाशिककर' अशी झाली होती.
advertisement
ठाकरे बंधू एकत्र, पण रणनीती ठरली निष्प्रभ
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू भाजपला रोखण्यासाठी एकाच व्यासपीठावर आले नसले तरी त्यांनी संयुक्तपणे भाजपला लक्ष्य केले होते. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही महाजन यांच्या विरोधात मोठी तटबंदी उभी केली होती. मात्र, या सर्वपक्षीय चक्रव्यूहाला भेदण्यात महाजन यशस्वी ठरले.
advertisement
विजयाची 'ती' तीन प्रमुख कारणे
तळ ठोकून प्रचार - महाजनांनी सलग ८ दिवस नाशिकमध्ये मुक्काम करून शेवटच्या क्षणी नाराजांना प्रचारात उतरवले.
विकासकामांची साद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या आधुनिक निर्मितीसाठी दिलेली साद आणि सिंहस्थासाठी नियोजित ३० हजार कोटींच्या विकासकामांचा मुद्दा मतदारांना भावला.
जागांचे समीकरण - २०१७ मध्ये ६६ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा ७२ चा आकडा गाठून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
नाशिकमध्ये भाजपची सत्ता
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत एकूण १२२ जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना (शिंदे गट) २६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेसला ३, अजित पवार गटाला ४, मनसेला १ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला १ जागा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. दरम्यान, महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडून घेतला जाणार आहे. गटनेत्याची निवड आणि अधिकृत गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया पार पडणार आहे. महापौरपदासाठी प्रदेश नेतृत्व निर्णय घेणार असून, त्याच निर्णयानुसार महापौर निश्चित केला जाईल. त्यामुळे भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर! कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
Next Article
advertisement
Mayor Reservation Lottery List: कोल्हापूरसह 8 जिल्ह्यांमध्ये OBC चा महापौर, 4 महानगरपालिकांमध्ये महिलांना संधी
Mayor Reservation: कोल्हापूरसह 8 जिल्ह्यांमध्ये OBC चा महापौर, 4 महिलांना संधी
  • २९ महापालिकांच्या महापौरपदासाठीची बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार

  • या सोडतीने अनेक प्रस्थापित नेत्यांचे राजकीय गणित बिघडवले

  • नवीन चेहऱ्यांसाठी सत्तेची कवाडे उघडली आहेत.

View All
advertisement