लातूरचा महापौर ठरला, काँग्रेसमधून तीन नावं समोर, कुणाची वर्णी लागणार? आरक्षण कुणाला सुटलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लातूर महानगरपालिका निवडणुकीत अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४३ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. आज लातूरच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
शशिकांत शिंदे, प्रतिनिधी लातूर: लातूर महानगरपालिका निवडणुकीत अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४३ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. आज (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत लातूरच्या महापौरपदासाठी अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग निश्चित झाल्याने काँग्रेसमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महापौरपदासाठी काँग्रेसची संभाव्य नावे:
१) कांचन अजनीकर: कांचन अजनीकर या काँग्रेसच्या अनुभवी आणि निष्ठावान नगरसेविका आहेत. त्यांची प्रभागातील पकड आणि पक्ष संघटनेतील काम पाहता, त्यांना महापौरपदाची पहिली पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.
२) जयश्री सोनकांबळे: आरक्षण सोडतीनंतर जयश्री सोनकांबळे यांचे नाव देखील आघाडीवर आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील एक सुशिक्षित आणि सक्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
advertisement
३) मनिषा बसपुरे: मनिषा बसपुरे या देखील महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी असलेले जवळचे संबंध आणि प्रशासकीय कामाची जाण यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.
लातूर महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची संधी हुकली आहे. काँग्रेसकडे ४३ पेक्षा जास्त जागांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे. लातूरच्या राजकारणात 'देशमुख' कुटुंबाचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे देशमुख कुटुंब कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 12:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लातूरचा महापौर ठरला, काँग्रेसमधून तीन नावं समोर, कुणाची वर्णी लागणार? आरक्षण कुणाला सुटलं?








