Fire Department Vacancy: नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नोकर भरती, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो भरती
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
NMC 186 Vacancy Fire Department Notification: नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये नोकर भरती जाहीर केली आहे. तब्बल 186 पदांसाठी ही भरती केली जात आहे. ओक्टोबर 2025 मध्ये ही नोकर भरती जाहीर केली होती.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक महानगर पालिकेने वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरभरतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक तांत्रिक पदांसाठी नोकरभरती जाहीर केली होती. आता त्यानंतर, अग्निशमन विभागामध्ये नोकर भरती जाहीर केली आहे. तब्बल 186 पदांसाठी ही भरती केली जात आहे. ओक्टोबर 2025 मध्ये ही नोकर भरती जाहीर केली होती. या नोकरभरतीच्या तारखेंमध्ये बदल करण्यात आला आहे. शेवटची तारीख नाशिक महानगर पालिकेकडून वाढवण्यात आली आहे. अग्निशमन दलामध्ये कोणकोणत्या पदासाठी नोकर भरती होतेय, जाणून घेऊया...
नाशिक महानगर पालिकेमध्ये, अग्निशमन दलात 186 पदांसाठी नोकरभरती पार पडत आहे. चालक-यंत्र चालक किंवा वाहन चालक(अग्निशमन) आणि फायरमन (अग्निशामक) अशा दोन विभागांमध्ये, नोकरभरती केली जात आहे. ही भरती गट- क आणि गट- ड मध्ये केली जात आहे. एकूण 186 जागांवर ही भरती होत असून चालक-यंत्र चालक किंवा वाहन चालक(अग्निशमन) पदासाठी 36 जागांसाठी तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 186 जागांवर नोकरभरती केली जात आहे. दोन्हीही पदांसाठी महिला आणि पुरूष अशा दोन्हीही वर्गांसाठी नोकर भरती होत आहे. नाशिक महानगर पालिकेकडून जाहीर केलेल्या शारिरीक पात्रतेमध्ये नमूद केलेले आहे.
advertisement
अधिकृत जाहिरातीची लिंक - https://drive.google.com/file/d/1hp5l3Lhssg-5eCe0d9FpL0CfFGt2xClr/view
अधिकृत वेबसाईट - https://nmc.gov.in/
पुरूषांसाठी उंची 165 सेमी, छाती 81 सेमी, फुगवून 05 सेमी पेक्षा जास्त आणि वजन 50 KG इतके आहे. तर, महिलांसाठी उंची 157 सेमी, छातीसाठी काहीही मोजमाप दिलेले नाही आणि वजन 46 KG ची आवश्यकता आहे. चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) पदासाठी 10वी उत्तीर्ण, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा किंवा वाहनचालक म्हणून किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव अशा शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे. तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला अशी शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे.
advertisement
तर, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे इतके पूर्ण असावे. मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांची परीक्षा फी 1000रू. असून मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांची फी 900 रू इतकी असेल. चालक-यंत्र, चालक किंना वाहन चालक (अग्निशमन) या पदांसाठी 19,900/- ते 63,200/- इतका पगार मिळेल. तर, फायरमन (अग्निशामक) पदासाठी 19,900/- ते 63,200/- इतका पगार मिळेल.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 07, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Fire Department Vacancy: नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नोकर भरती, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो भरती


