Nashik Crime: रिक्षातून लिफ्ट द्यायचे अन्..., नाशिकमधील धक्कादायक घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिकमध्ये रिक्षातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवणार्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आला आहे.
नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रिक्षातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला अज्ञात स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवणार्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचे संपूर्ण भांडं आडगाव पोलिसांनी उघड केले आहे. चोरी केल्याचा प्रकार घडल्याच्या अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी तीन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रिक्षा, मोबाईल फोन आणि चाकू असा एकूण एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी साधला डाव
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदिप थोडाई कुमार (32, निलगिरी बाग) हा पीओपी कामगार 4 मार्च रोजी दुपारी नांदूर नाका रिक्षा स्टँडवर उभा होता. एका रिक्षाचालकाने त्याला निलगिरी बागेत सोडतो, असं सांगून त्याला रिक्षात बसवलं. पण, त्या रिक्षा ड्रायव्हरने त्याला निलगिरी बागेत सोडण्याऐवजी, रिक्षा रुद्र फार्मसमोरील एका अज्ञात स्थळी नेली. तिथे आरोपींनी त्या पीओपी कर्मचाऱ्यावर हल्ला करत, चाकूचा धाक दाखवला, त्याचा मोबाईल आणि त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून तिथून पळ काढला. या चोरीची आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आरोपीचा शोध कसा घेतला?
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी एक पथक रवाना केले. पीएसआय विकास पंचमुख यांच्या पथकाने परिसरातील सुमारे 23 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित रिक्षाचा शोध घेत असताना, पोलीस अधिकारी मनोज मोरे आणि शक्ती पेंढारकर यांना नांदूर गावातील स्मशानभूमीजवळ एक संशयास्पद रिक्षा उभी असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून प्रशांत भारसाखळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव आणि विजय भगवान मोरे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून रिक्षा, एक Vivo मोबाईल फोन, रोख रक्कम आणि चाकू जप्त करण्यात आला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 4:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: रिक्षातून लिफ्ट द्यायचे अन्..., नाशिकमधील धक्कादायक घटना





