advertisement

Nashik News: अयोध्या पाठोपाठ नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत मोठा निर्णय, धर्मध्वज फडकवला जाणार

Last Updated:

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येच्या प्रभू श्री राम मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरातही धर्मध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

News18
News18
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येच्या प्रभू श्री राम मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरातही धर्मध्वज फडकवला जाणार आहे. अलीकडेच हा निर्णय मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला असून त्याप्रमाणे आता तयारी सुद्धा करण्यात आली आहे. नेमकं केव्हापर्यंत हा धर्म ध्वज फडकवला जाणार आहे, याची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तब्बल 20 फूट धर्म ध्वज मंदिरावर उभारला जाणार असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरच मंदिर विश्वस्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
खरंतर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फक्त देशातूनच नाही तर, परदेशातूनही करोडो भाविक येत असतात. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक नाशिकमधील अनेक देवस्थानांना भेटी देत असतात. त्या पैकीच एक सुप्रसिद्ध काळाराम मंदिर देखील आहे. काळाराम मंदिरावर आता 20 फूट उंच धर्मध्वज फडकवला जाणार असल्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. अयोध्येच्या प्रभू श्री राम मंदिरानंतर आता नाशिकच्या काळाराम मंदिरातही धर्मध्वज फडकवला जाणार आहे. धर्मध्वज उभारणीचा संपूर्ण खर्च काळाराम मंदिर संस्थान करणार असल्याचे बोलले जात आहे. नेमकं केव्हापर्यंत धर्मध्वज फडकवला जाणार आहे, याची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. पण, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरच हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या येथे राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्म ध्वज फडकवण्याच्या ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते. तर, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये देशभरासह जगभरातून दररोज लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. पंतप्रधानांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या या धर्म ध्वजावर काही महत्त्वाचे चिन्हे आहेत. त्यावर एक कोविदार झाड, सूर्य आणि ओमचं चिन्ह आहे. अशे चिन्हे असलेला तो धर्म ध्वज आहे. आता नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उभारला जाणारा धर्म ध्वज कसा आहे, याची प्रत्येकालाच आता उत्सुकता लागून राहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: अयोध्या पाठोपाठ नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत मोठा निर्णय, धर्मध्वज फडकवला जाणार
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement