Harshit Rana : हातात काठी, पायाने लंगडत लंगडत हर्षित राणा पुरस्कार सोहळ्याला पोहाचला, VIDEO पाहून धक्का बसेल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हर्षित राणा देखील पोहोचला होता. पण तो हातात काठी आणि लगडत लगडत या सोहळ्याला पोहोचला होता.त्यामुळे त्याची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच त्याची किव येत होतं.
Harshit Rana Naman Award 2026 : बीसीसीआयचा नमन ॲवॉर्ड सोहळा रविवारी दिल्लीत मोठा थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात टीम इंडियांची अंडर 19 पुरूष आणि महिला खेळाडूपासून सिनिअर टीम इंडियाचे महिला आणि पुरुष खेळाडू उपस्थित होते. या खेळाडूंचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला होता. या सोहळ्याला टीम इंडियाचा हर्षित राणा देखील पोहोचला होता. विशेष म्हणजे तो ज्या अवस्थेत या सोहळ्याला उपस्थित राहायला ते पाहून सगळ्यांना धक्का बसला होता.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
खरं तर बीसीसीआयच्या नमन ॲवॉर्ड सोहळ्याला सगळेच उपस्थित होते. हर्षित राणा देखील पोहोचला होता. पण तो हातात काठी आणि लगडत लगडत या सोहळ्याला पोहोचला होता.त्यामुळे त्याची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच त्याची किव येत होतं.
Harshit Rana walking with a walking stick during the BCCI Awards.
Get well soon, Harshit Rana. pic.twitter.com/OPmqLvRXW9
— Sonu (@Cricket_live247) March 16, 2026
advertisement
या सोहळ्यात हर्षित राणाला देखील एक पुरस्कार घोषित करण्यात आला होता.नमन ॲवॉर्ड 2026 मध्ये हर्षित राणाला बेस्ट इंटरनेशनल डेब्यूट 2024-25 चा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. पण हा पुरस्कार घ्यायला तो स्टेजवरच गेला नव्हता.हर्षा भोगले यांनी स्टेजवर या पुरस्काराची घोषणा केली होती.त्यानंतर त्यानी बीसीसीआयचे चेअरमन अरुण धुमाल यांना हर्षित राणाच्या जवळ जाऊन त्याला पुरस्कार दिला होता.अरुण धुमाल त्याच्या जवळ येताच हर्षित राणा त्याच्या खुर्चीवरून उठला आणि त्याने पुरस्कार स्विकारला होता.
advertisement
खरं तर हर्षित राणा हा टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप संघाचाही भाग होणार होता. पण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती.दक्षिण आफ्रिकेविरूद्ध गोलंदाजी करताना हर्षित राणाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.त्यामुळे तो एक ओव्हर टाकून मैदानाबाहेर झाला होता. त्याच्यानंतर त्याला वर्ल्डकपमधून बाहेर व्हावे लागले.
त्यानंतर मुंबईत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.पण अद्याप त्याचा पाय बरा झाला नाही आहे.त्यामुळे तो आयपीएल 2026 मधून देखील बाहेर झाला आहे.
advertisement
नमन ॲवॉर्ड सोहळ्यात स्मृती मानधना आणि शुभमन गिलला सर्वोत्कृष्ट महिला व पुरुष क्रिकेटपटू ठरले. तर माजी खेळाडू रॉजर बिन्नी,राहुल द्रविड आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत भारतीय संघाच्या 5 विविध वर्ल्डकप विजेत्या संघाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अंडर 19 महिला वर्ल्ड कप,अंडर 19 पुरुष वर्ल्ड कप,चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, महिला वनडे वर्ल्ड कप 2025, टी20 वर्ल्ड कप विजेत्या पुरूष भारतीय संघाचाही समावेश होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 4:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Harshit Rana : हातात काठी, पायाने लंगडत लंगडत हर्षित राणा पुरस्कार सोहळ्याला पोहाचला, VIDEO पाहून धक्का बसेल








