advertisement

Nashik News : नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

Last Updated:

Nashik News : सिडकोतील केवल पार्क परिसरात दोन गटातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला.

News18
News18
नाशिक, (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी) : गेल्या काही महिन्यांत शहरात घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर पोलिसांची जरब राहिली नसल्याचे दिसत आहे. असे असताना गुन्हेगारींना आता थेट खादी वर्दीवरच हात उचलल्याने खळबळ उडाली आहे. सिडकोतील केवल पार्क परिसरात बांधकामावरून दोन गटात सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांच्यावर चाकू हल्ला तसेच उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सातपेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (2 ऑगस्ट) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिडकोतील केवल पार्क परिसराजवळ गाडे मळा येथे दोन गटात बांधकामावरून खूप वादावादी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेवुन नियत्रण कक्ष येथील राखीव पोलीस फोर्स घेवुन पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांनी घटना स्थळ गाठले. यावेळी बांधकाम व्यवसाईक व जागा मालकाचे नातलग यांच्यात हा वाद सुरू होता.
advertisement
मालक सचिन जानी आणि महानगर पालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे कर्मचाऱ्यांना घेऊन आले. त्यावेळी तेथे उपस्थित बेबी गाडे यांनी महापालिका अधिकारी आणि इतरांना काम करण्यास विरोध केला. मजूर गाळा उघडण्याचा प्रयत्न करत असताना बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे या संशयितांनी मजुरांना मारहाण केली. यावेळी उपनिरीक्षक उंडे यांच्यासमवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे अन्य सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपस्थित जमावाला समजावत असताना त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. संशयित सुजाता उर्फ बेबी गाडे हिने उपनिरीक्षक उंडे यांच्या हाताला नखाने ओरबाडून जखमी केले. त्यांना मारहाण केली. अश्विनी पवार यांच्या हातालाही नखाने ओरबाडले. भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांनीही पवार यांना मारहाण केली.
advertisement
वाचा - लोखंडी रॉडने सपासप 13 वार करुन तरुणाला संपवलं, नाशिकमधला मन विचलित करणारा VIDEO
याविषयी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील पवार यांनी माहिती दिली. संबंधित ठिकाणी १०० हून अधिक लोक जमा होते. त्यामुळे स्वत: जादा कुमक घेऊन गेलो. महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. आपल्यावर चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून सायंकाळी उशीरा पर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
view comments
मराठी बातम्या/नाशिक/
Nashik News : नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement